आॅनलाईन लोकमतअमरावती : शासनाच्या ‘लिव्ह अँड लायसन्स’ करारानुसार आता घराचा आॅनलाइन भाडेकरार करावा लागणार आहे. भाडेकराराची ई-नोंदणी होणार असल्याने शासनाच्या तिजोरीत भर पडेल व न्यायालयात त्याची दखल घेतली जाईल.यापूर्वी घर भाड्याने देताना मालक शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्यायचे. मात्र, घरमालकाशी वितुष्ट निर्माण झाले की, भाडेकरू घर सोडण्यास नकार देत होते. शंभर रुपयांचे भाडेकराराचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात टिकत नव्हते. मात्र, ई-नोंदणीमुळे घरमालक बिनधास्त झाले आहेत. भाडेकराराची मुद्रांक व नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणी घरबसल्यादेखील करता येईल. यासाठी नोंदणी शुल्क फारच कमी आहे. नोंदणी अर्ज दाखल केल्यानंतर ई-मेलवर घरभाडे करारनाम्याचे प्रमाणपत्रही मिळेल. यामुळे हा व्यवहार १०० टक्के पारदर्शक असेल, असे मुद्रांक व नोंदणी विभागाने स्पष्ट केले आहे. भाडेकराराची दुय्यम उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे.असा करावा लागेल करारघरभाडे करार करताना मालक आणि भाडेकरूंना अटी-शर्तीनुसार करार करावा लागेल. भाड्याची रक्कम, अनामत रक्कम यांचा उल्लेख असेल. पाणीपट्टी, वीज देयके, सोसायटी, देखभाल, सुरक्षा खर्चाचा समावेश राहील. भाडेकराराची जागा निवासी की व्यवसाय, याबाबत उल्लेख बंधनकारक आहे.शासनाच्या ‘लिव्ह अँड लायसन्स’ करारानुसार भाडेकरार बंधनकारक आहे. मात्र, याबाबत नवे सॉफ्टवेअर मिळाले नाही. तूर्तास आॅनलाइन भाडेकरारास विराम असून, लवकरच नवी प्रणाली सुरू केली जाईल.- सु.अ. बुटलेसह जिल्हा निबंधक वर्ग १, नोंदणी व मुद्रांक विभाग
आता भाडेकरार आॅनलाईन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 10:46 PM
शासनाच्या ‘लिव्ह अँड लायसन्स’ करारानुसार आता घराचा आॅनलाइन भाडेकरार करावा लागणार आहे.
ठळक मुद्देउपनिबंधकांकडे नोंदणी : घरमालक-भाडेकरूंमधील वाद शमणार