पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता स्वत:च एक ब्रॅन्ड झाले असून त्यांची प्रत्येक कृती युवकांना स्टायलिस्ट वाटू लागली आहे. त्यामुळेच आता मोदींच्या पेहरावाची स्टाईलही युवकांकडून फालो केली जात असून ज्ॉकेट्स व कुर्त्यांंना मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. नेहरू ड्रेसनंतर ‘नमो’ ज्ॉकेट हिरोंच्याच स्टाईलची कॉपी केली जाते असे नाही तर नेत्यांच्या कपड्यांचीही स्टाईल वेळोवेळी कॉपी केली गेली आहे. आता आतापर्यंत नेहरू ड्रेसची क्रेझ होती. आजही कुर्ता-पायजाम्याला नेहरू ड्रेस असेच संबोधले जाते. महात्मा गांधींनी कधीही टोपी वापरली नाही. मात्र तरीदेखील गांधी टोपी हे एक प्रकारचे ब्रँडच आहेत. आता सर्वत्र नरेंद्र मोदी यांच्या नावाचीच जादू चालत असल्यामुळे कुर्ते व ज्ॉकेट यांना युवकांची पसंती दिसून येत आहे. ‘नमो ज्ॉकेट’ असेच नाव विक्रेत्यांनी या ज्ॉकेटला दिले आहे.
आता कपड्यांवरही ‘नमो इफेक्ट’
By admin | Published: June 02, 2014 12:53 AM