शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

आता वाघांचे आॅनलाईन दर्शन, मेळघाटात राज्यातील पहिला प्रयोग, वरिष्ठ वनाधिका-यांच्या परिषदेत प्रात्यक्षिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 4:41 PM

द-या-खो-यात विस्तारलेल्या मेळघाटात आता व्याघ्रांचे दर्शन आॅनलाईन होणार आहे. त्याकरिता प्रवेशद्वारावर पर्यटकांचा ‘बायोडाटा’ संगणकात कैद होणार असून दिवसभरात किती जणांनी भेटी दिल्यात, याची माहिती एका ‘क्लिक’वर मिळेल. वाघांचे आॅनलाईन दर्शन घडविणारे मेळघाट राज्यात पहिला व्याघ्र प्रकल्प ठरेल.

- गणेश वासनिक अमरावती, दि. 17 -  द-या-खो-यात विस्तारलेल्या मेळघाटात आता व्याघ्रांचे दर्शन आॅनलाईन होणार आहे. त्याकरिता प्रवेशद्वारावर पर्यटकांचा ‘बायोडाटा’ संगणकात कैद होणार असून दिवसभरात किती जणांनी भेटी दिल्यात, याची माहिती एका ‘क्लिक’वर मिळेल. वाघांचे आॅनलाईन दर्शन घडविणारे मेळघाट राज्यात पहिला व्याघ्र प्रकल्प ठरेल.राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी क्षेत्रफळाच्या तुलनेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प सर्वात मोठा आहे. वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचा संचार असून सागवान व दुर्मिळ वनौओषधींसाठी प्रसिद्ध आहे. आदिवासीबहुल मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सुमारे ४० ते ४५ वाघांची संख्या आहे. तथापि इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत पर्यटकांची गर्दी खेचण्यात मेळघाट माघारले आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख विकास प्रबोधिनी प्रशिक्षण संस्थेत पार पडलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ वनाधिकाºयांच्या परिषदेत मेळघाटचे सौंदर्य, व्याघ्रांचे दर्शन पर्यटकांना घेता यावे, यासाठी ‘फॉरेस्ट ट्रान्झिस्ट पास’ आॅनलाईन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही ट्रांझिस्ट पास कशी असेल, याबाबत प्रधान मुख्य वनसचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री.भगवान यांच्या विशेष उपस्थितीत प्रात्यक्षिकही झाले. व्याघ्रांचे दर्शन, जंगल सफारी, दुर्मिळ स्थळांना भेटी, नरनाळा किल्ल्याची पाहणी, सेमाडोह, चिखलदरा, ढाकणा व कोहाकुंड येथील निसर्गरम्य स्थळांना भेटी आदींचा जंगल सफारीत समावेश राहणार आहे. लवकरच मेळघाटात ‘व्याघ्रांचे आॅनलाईन दर्शन’हा अभिनव उपक्रम सुरू होणार आहे. तत्पूर्वी व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. प्रत्येक प्रवेशद्वावर इंटरनेटची सुविधा असावी, यासाठीदेखील वनविभाग आग्रही आहे. त्यानुसार व्याघ्र दर्शनाच्या आॅनलाईन प्रणालीसाठी एजन्सी नेमली जाणार असल्याची माहिती आहे. 

या प्रवेशद्वारावर असेल पर्यटकांची नोंदमेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्रवेश मिळण्यापूर्वी प्रवेशद्वारावर नोंद करावी लागेल. त्यानंतरच व्याघ्रांचे आॅनलाईन दर्शन घेता येईल. यात खटकाली, धूळघाट, धामणगाव गढी, सेमाडोह, बिहाली, टेभ्रुसोंडा, जारिदा, धारणी, वैराट, मेमना, कोहा, कुंड, ढाकणा, पोपटखेड आदी प्रवेशद्वारांचा समावेश राहिल.

अशी असेल ‘ट्रांझिस्ट’ पासमेळघाटात व्याघ्रदर्शन घेताना प्रत्येक पर्यटकांचा ‘बायोडाटा’ आॅनलाईन राहिल. त्याकरिता वनविभागाकडून पर्यटकांना ‘ट्रांझिस्ट’ पास दिली जाईल. यात पर्यटकांच्या प्रवेशाची तारीख, वेळ, प्रवेशद्वार क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक, वाहनक्रमांक, वाहनांचा प्रकार, पर्यटकांची एकूण संख्या, शुल्क रक्कम, बाहेर पडणाºया प्रवेशद्वाराचा क्रमांक आदी बाबी समाविष्ट राहतील.

किती पर्यटकांनी भेटी दिल्यात आता हे एका ‘क्लिक’वर कळू शकेल. व्याघ्र प्रकल्पाचा कारभार आॅनलाईन करताना प्रवेशद्वारावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जातील. जेणेकरून प्रवेशद्वारातून कोणत्या वाहनांची ये-जा झाली, हे क्षणात कळू शकेल.- एम.एस.रेड्डी,क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प