आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रतीक्षा मेहत्रे हत्याकांड शांत होत नाही तोच एका शाळकरी मुलीच्या अंगावर गरम तेल फेकण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी शहरात घडला. या घटनेमुळे पुन्हा अमरावती शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. बुधवारी शहरातील महिला संघटनांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे धाव घेऊन याविषयी ठोस पाऊल उचलण्याची मागणी केली.शहरात महिला अत्याचारांचे गुन्हे वाढल्याने महिलांच्या सरंक्षणासाठी आता महिला संघटना सरसावल्या आहेत. प्रतीक्षा मेहत्रे हत्याकांडानंतर एका तरुणीवर उकळलेले तेल फेकण्याचा प्रसंग धक्कादायक ठरला आहे. या विषयात पोलीस आयुक्तांनी महिलांच्या भावना जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे.सामाजिक बदलांमुळे अल्पवयीन व तरुण पिढी वाममार्गाने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सीपींनी महिलांसमोर मांडले. यासाठी शाळा-महाविद्यालय स्तरावर पालक मेळावा, मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक, शाळकरी मुलांमध्ये जनजागृती, एनजीओंच्या मदतीने सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रातील समस्यांचे निरसन करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सीपींनी मत व्यक्त केले. पोलीस आपल्या परीने काम करीत आहेत.महिलांच्या सुरक्षेसाठी १४ दामिनी पथक सज्ज करण्यात आली आहेत. दररोज ही पथके शाळा-महाविद्यालयांवर लक्ष ठेवून आहे. साध्या वेशातसुद्धा पोलीस तैनात आहेत. गार्डन, मंदिर व निवांत ठिकाणे आदींकडे लक्ष केंद्रित केल्याचेही सीपींनी महिला संघटनांना सांगितले.जिजाऊ ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारामहिला व युवतींवरील अत्याचाराविरोधात जिजाऊ ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी मयुरा देशमुख, शीला पाटील, मनाली तायडे, कल्पना वानखडे, तेजस्विनी वानखडे, प्रतिभा रोडे, सुषमा बर्वे, कल्पना बुरंगे, करुणा कदम, कल्पना ढोके, निशा सोनवणे, नयना कदम, मंदा कदम, मैथिली तायडे, मंजू ठाकरे, सुजाता झाडे, भाग्यश्री मोहिते, सरला इंगळे आदी उपस्थित होत्या.भाजप उचलणार पीडित मुलीच्या उपचाराचा खर्चउकळते तेल फेकल्याने भाजल्या गेलेल्या पीडित मुलीची भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी बुधवारी भेट घेतली. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च भाजप उचलणार असल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले. प्रतीक्षा मेहत्रेच्या निर्घृण खुनापाठोपाठ या गंभीर घटनेने अमरावती शहर हादरले आहे. पीडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयातून डॉ. भरत शहा यांच्याकडे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. भाजप पदाधिकाºयांनी पीडित मुलीची तेथे भेट घेतली. आ. सुनील देशमुख यांनी दूरध्वनीहून मुलीच्या वडिलांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुधीर थोरात, नीलेश शिरभाते, विवेक चुटके, संदीप कंधारे, महिला आघाडी सरचिटणीस लता देशमुख, अलका सप्रे, सविता भागवत आदी उपस्थित होते.शिवसेनेतर्फे निवेदनशिवसेनेच्या संपर्कप्रमुख शोभा गायकवाड यांच्या नेतृत्वात श्रद्धा गहलोद, आरती जाधव यांच्यासह महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषा टेंभरे, अरुणा इंगोले, शारदा पेंदाम, वर्षा भोयर, नंदा श्रीराव, वंदना घुगे, सूर्यकांता ढोक, प्रियंका ठाकूर व आशा सगणे यांनी सीपींना निवेदन सादर केले. शाळा सुटल्यावर त्या परिसरात पोलीस यंत्रणा सज्ज करावी, अशी मागणी महिलांनी रेटून धरली होती.अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटीअमरावती शहर महिला काँग्रेस कमिटीतर्फे महिलांच्या सुरक्षेसंबंधी बुधवारी सीपी दत्तात्रय मंडलिक यांना निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयांत पोलीस यंत्रणा सज्ज करावी, अशी मागणी महिलांनी सीपींना केली. यावेळी अर्चना सवाई, कुंदा अनासाने, जयश्री वानखडे, सविता धांडे, सारिका नितनवरे आदी उपस्थित होत्या.पीडितेच्या नावावर दुसऱ्याच मुलीचा फोटो व्हायरलअॅसिड हल्ला झाल्याची घटना शहरासह राज्यभरात वाºयासारखी पसरली. मात्र, ते अॅसिड नसून उकळते तेल असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. घटनेच्या अनुषंगाने काही व्हॉटसअॅपवर एका मुलीचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. मात्र, व्हायरल झालेला फोटो हा पीडीत मुलीचा नसून एका दुसºयाच मुलीचा फोटो काही समाजकंटकांनी व्हायरल केला आहे. या अफवेला दुजोरा न देता तो फोटो डिलिट करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. ज्या मुलीचा फोटो व्हायरल झाला, तिच्या वडिलाने फ्रेजरपुरा पोलिसांशी संपर्क केला असून त्याची तक्रार केली जाणार आहे. फोटो व्हायरल करणाºयांवर पोलीस कारवाई करणार आहेत.शाळा-महाविद्यालयांत शुकशुकाटअॅसिड फेकल्याच्या घटनेची अमरावतीत दहशत निर्माण झाली असून काही टवाळखोर तरुण शाळकरी मुलींना लक्ष्य केल्याची अफवा पसरत आहे. या अफवेला पेव फुटल्यामुळे बुधवारी बहुतांश शाळा व महाविद्यालयात विद्यार्थिनी आल्याच नसल्याचे चित्र होते. मुलींमध्ये निर्माण झालेल्या धास्तीमुळे हा प्रकार अमरावतीत पाहायला मिळाला असून, ही घटना केवळ एका मुला व मुलीच्या वैयक्तिक संबंधातून झालेली आहे. त्यामुळे शाळकरी मुलींना घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांनी केले पीडिताचे सांत्वनजिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि तिचे व तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख, आरोग्य व वित्त सभापती बळवंत वानखडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर, आदींनी पीडित मुलीची भेट घेतली.
आता पोलीस देणार समाजजागृतीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 10:23 PM
प्रतीक्षा मेहत्रे हत्याकांड शांत होत नाही तोच एका शाळकरी मुलीच्या अंगावर गरम तेल फेकण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी शहरात घडला.
ठळक मुद्देमहिला सुरक्षेचा विषय : महिला संघटनांची पोलीस आयुक्तांकडे धाव