लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात क्लस्टरबाहेरही आता कोरोना विषाणू संसर्गाचा शिरकाव झालेला आहे. बडनेरा, मसानगंजनंतर कंवरनगरात कोरोनाने पाय पसारल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी एकूण बारा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ४० वर पोहोचलीे. शहरात २३ एप्रिलला ९, तर ३० ला ४० कोरोनाग्रस्त निष्पन्न झाल्याने आता कोरोनाचा गुणाकार सुरू झालेला आहे. त्यामुळे शहरात समूह संक्रमणाची भीती निर्माण झाली आहे.शहरात २५ एप्रिलपर्यंत ‘क्लस्टर हॉटस्पॉट’मध्ये बाधितांची संख्या २१ होती. त्याच दिवशी बडनेऱ्याच्या नूरनगरात ५३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हॉटस्पॉटव्यतिरिक्त इतर भागांतही कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर २० एप्रिलला याच बाधिताच्या कुटुंबातील ४५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ३० एप्रिलला येथील मसानगंज भागातील ७४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता गुरुवारी कंवरनगरातील संशयित मृताच्या कुटुंबातील ७८ वर्षीय महिला, ४८ व ४७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने क्लटर हॉटस्पॉटबाहेरही सहा कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.शहरात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४० झालेली आहे. यामध्ये सात दगावले. चार कोरोनामुक्त झाले आहेत. २९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. या आठवड्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आता शहरात समूह संक्रमणाचा धोका निर्माण झालेला आहे.महापालिका प्रशासनाद्वारे क्लस्टर झोनमधील बाधितांच्या घराकडील मार्ग सील केले. आयुक्तांनी या भागात २७ कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. पोलीस विभागाद्वारे १० ठिकाणी चेक पोस्ट लावले असले तरी संचारबंदी, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कने चेहºयाचा तोंड, नाक आदी भाग झाकणे आदी नियमांचे पालन या परिसरात बहुतांश व्यक्तींकडून होत नसल्याचे दिसून येते.दरम्यान, शहरात आता अनेक ठिकाणी कोरोनाचा उद्रेक होत असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीला आता राज्य राखीव पोलीस दलाचे जवानदेखील राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिली.ग्रामीणमध्येही हायरिस्क व्यक्तीशहरातील कोरोनाग्रस्तांचा संपर्क ग्रामीण भागात तीन ठिकाणी आल्याने या हायरिस्कच्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. एक बाधित महिलेचा संपर्क रिद्धपूर येथे आल्याने तेथील पाच व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले. बडनेरा येथील बाधिताचा संपर्क अचलपूर येथे आल्याने तेथील पाच व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते तसेच नांदगाव तालुक्यातील काही व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.दिवसभरात १२ पॉझिटिव्हयेथील क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये खोलापुरी गेट येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील तीन महिला व दोन पुरुष, हनुमाननगरातील बाधित पती-पत्नीच्या घरालगतची एक महिला व अशा एकूण पाच व्यक्तींचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरिक्त कंवरनगरातील दोन महिला व एक पुरुष तसेच नालसाबपुरा येथील दोन महिला व एक पुरुष असे दिवसभरात १२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आता समूह संक्रमणाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 5:00 AM
शहरात २५ एप्रिलपर्यंत ‘क्लस्टर हॉटस्पॉट’मध्ये बाधितांची संख्या २१ होती. त्याच दिवशी बडनेऱ्याच्या नूरनगरात ५३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हॉटस्पॉटव्यतिरिक्त इतर भागांतही कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर २० एप्रिलला याच बाधिताच्या कुटुंबातील ४५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ३० एप्रिलला येथील मसानगंज भागातील ७४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
ठळक मुद्दे‘क्लस्टर’बाहेर शिरकाव : गुरुवारी विविध भागात १२ पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या ४०