शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

आता एसटीचेही कळणार लोकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:07 PM

एसटीची फेरी नेमकी किती वाजता येणार त्याचा अंदाज नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. बसची वाट पाहत वेळ केल्यास प्रवासी अन्य वाहतूक सेवेकडे वळतो. यावर तोडगा काढला जाणार आहे.

ठळक मुद्देदिवाळीपासून अंमलबजावणी : मोबाईल अ‍ॅपचा होणार वापर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटीची फेरी नेमकी किती वाजता येणार त्याचा अंदाज नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. बसची वाट पाहत वेळ केल्यास प्रवासी अन्य वाहतूक सेवेकडे वळतो. यावर तोडगा काढला जाणार आहे. एसटी गाड्यांमध्ये महामंडळातर्फे व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) अंतर्भूत केली जाणार आहे.दिवाळीपासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार असून, एसटीचा प्रवासीदेखील येत्या काही महिन्यात हायटेक होणार आहे. ग्रामीण भागात लाल धुरळा उडवत जाणारी एसटी बस म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. या सेवेमुळे गाव,वाडया, वस्ती तांडा जोडला जाऊन ग्रामीण भागाचे तसेच शहरवासीयांचे जीवन एसटी सेवेशी निगडित आहे. लांब पल्ल्याचा प्रवास असो अथवा जवळचा प्रवास असो सर्वसामान्य प्रवासी एसटीला प्रथम प्राधान्य देत असल्याने या सेवेमध्ये बदल अपेक्षित आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून एसटी सेवेत अनेक महत्त्वपूर्ण आमूलाग्र बदल व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रवाशांना सुखकर सेवा देण्याकरिता प्रशासन कटिबद्ध झाले आहे. त्याचाच परिपाक म्हणून एसटीच्या सेवेमध्ये शिवशाहीेसारख्या गाड्या प्रत्येक आगारांमध्ये दाखल होऊन ही सेवा दिली जात आहे. बहुतांश प्रवासी इच्छित स्थळी प्रवास करीत असताना लोकल मेल एक्स्प्रेस यासारख्या वाहतुकीच्या साधनाने प्रवास करीत असतात परंतु या गाड्या वेळेत किंवा उशिरा येत असल्याची माहितीचे प्रसारण लगेचच मोबाईलवर वा प्लॅटफॉर्मवर मिळते. पण बेस्ट, वा एसटी सेवेत ही मोठी उणीव जाणवत होती. एसटीसाठी बस थांब्यावर बरयाचवेळा प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना ताटकळत उभी राहण्याची आवश्यकता भासणार नाही.आगारात इलेक्ट्रॉनिक्स फलकप्रवाशांना बसचा ठावठिकाणा कळावा यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. त्या जोडीलाच आगारांमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्डाचा वापर करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित असणारी ही प्रणाली सेवेत आणण्यासाठी मागील वर्षी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यात निवड झालेल्या कंपनीने एसटीच्या सेवेचा आढावा घेतला आहे. त्याची सुरुवात दिवाळीदरम्यान होणार आहे.