नव्या चेहऱ्यांना संधी : आमदारांचे मत जाणून घेणारअमरावती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बहुप्रतीक्षेनंतर जम्बो प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. आता काँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्हा, शहराध्यक्ष नियुक्तीचे वेध लागले असून काँग्रेसच्या जिल्हाध्यपदी बबलू देशमुख कायम राहतील, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.नागपूर येथे मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंत्युत्सवाची सांगता करण्यात आली. सोनिया व राहुल गांधी यांनी भाजप व संघाबाबत आक्रमक भूमिका घेतली. संविधान आणि आरक्षणाला हात लाऊ देणार नाही, असा इशारा देत मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी नवचैतन्य निर्माण केले. त्याचअनुषंगाने मागील काही महिन्यांपासून रेंगाळलेल्या काँगे्रसच्याप्रदेश कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. येत्या वर्षात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य ंसंस्थेच्या निवडणुका लक्षात घेता जिल्हा व शहराध्यक्षपदामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतला आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी फारशी स्पर्धा नसल्यामुळे बबलू देशमख यांच्या गळ्यात पुन्हा अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. मात्र विद्यमान शहराध्यक्ष संजय अकर्ते यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेतील काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली जाणार असल्याची चर्चा आहे. दांडगा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेल्या व्यक्तिचीच अध्यक्षपदी निवड करावी, असा आग्रह काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या खा. अशोक चव्हाण यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करावी, याबाबत काँग्रेसचे आ.वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांचे मत जाणून घेतल्यानंतरच नांवे निश्चित होतील. तूर्तास अनेक कार्यकर्त्यांना नव्या कार्यकारिणीच्या गठनाबाबत उत्सुकता असून नव्या कार्यकारिणीचे गठन होताच जिल्हा काँग्रेस नव्या जोमाने कामाला लागणार आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसची धुरा शेखावत, देशमुखांकडे ?काँग्रेसचे जिल्हा व शहराध्यक्षपदी अनुक्रमे बबलू देशमुख, बबलू शेखावत यांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे आघाडीवर आहेत. या दोन्ही नावांना वरिष्ठांचा नकार नसल्याने पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी शहर, ग्रामीणची धुरा ‘बबलू’ नावाच्या व्यक्तिंकडेच सोपविली जाणार असल्याचे संकेत आहेत.
आता काँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्हा, शहराध्यक्ष नियुक्तीचे वेध
By admin | Published: April 18, 2016 11:57 PM