इच्छुकांची फिल्डिंग : ३ एप्रिल रोजी निवडअमरावती : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेत काँग्रेसला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी, रिपाइं गवई गटाच्या एका सदस्याला सत्तेत सामावून घेण्याचे संकेत आहे. चार विषय समित्यांची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी इच्छूकांनी आपापल्या राजकीय गॉडफादरकडे फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने आता विषय समिती सभापती निवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक २६ सदस्य निवडून आणलेल्या काँग्रेसने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली. त्यामुळे काँग्रेसला झेडपीची सत्ता मिळाली आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २६, शिवसेनेचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ असे ३२ सदस्य काँग्रेसकडे आहेत. काँग्रेसने मित्र पक्षाचे मदतीने झेडपीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. काँग्रेसने झेडपीचे अध्यक्षपद स्वत:कडे ठेवले, तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला तीन सदस्यांच्या बळावर उपाध्यक्ष बहाल केले. त्यामुळे आता चार विषय समितीच्या सभापती निवडीचे अधिकार हे मित्र पंक्षांनी काँग्रेसकडे दिले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते चार सभापतीपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सत्ता स्थापनेच्या सुरुवातीपासून काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलेले राकाँचे नेते हर्षवर्धन देशमुख यांच्या गटाचे दोन सदस्य आहेत. त्यापैकी एकाला सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. यासोबत रिपाइंचे सदस्य बळवंत वानखडे हे काँग्रेससोबत सुरुवातीपासून एकनिष्ठ असल्याने त्यांनाही सभापतीपदावर संधी मिळणार असल्याचे संकेत आहेत तर उर्वरित दोन समित्यांवर काँग्रेसच्या आ.यशोमती ठाकूर आणि मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे यांच्या गटांना प्रत्येकी एक सभापतीपद दिले जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे चार विषय समिती, दोन काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं मित्र पक्ष प्रत्येकी एक याप्रमाणे सभापती पद मिळण्याचे संकेत आहे. (प्रतिनिधी)या आहेत चार समित्याजिल्हा परिषदेत एकूण दहा समित्या असल्या तरी चार समितींचे सभापती महत्त्वाचे आहेत. यात शिक्षण व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण या चार समितींसाठी सभापती निवडले जाणार आहेत. सभापतीपदाचे संभाव्य दावेदार जयंत देशमुख, प्रकाश साबळे, अभिजित बोके, अलका देशमुख, महेंद्र गैलवार, दयाराम काळे,बळवंत वानखडे,कुकडे ताई यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
आता झेडपी विषय समिती सभापती निवडीचे वेध
By admin | Published: March 24, 2017 12:21 AM