- गणेश वासनिकअमरावती : अनाथ मुले १८ वर्षांची झाली की, त्यांना ते राहत असलेल्या अनाथ आश्रमात राहू दिले जात नाही. या वयात ही मुले-मुली आपल्या पायांवर उभीदेखील झालेली नसतात. यामुळे अनाथ मुला-मुलींचे वय २३ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना आश्रमात राहता येईल, असा निर्णय राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने घेतला. हा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयामुळे अनाथालय संचालित करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा मानला जात आहे. कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत १९५ मुले अनाथ झाली आहेत, आई व वडील गमावलेली १०८ बालके, तर एक पालक गमावलेली ८७ बालके आहेत.
यापुढे २३ व्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, आधार नसलेल्यांना मिळेल माेठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 7:09 AM