शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

सिंचनासाठी यापुढे नलिका वितरण प्रणालीचा अवलंब

By admin | Published: February 06, 2017 12:07 AM

उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामध्ये पाण्याचा दाब हा गुरूत्वाकर्षनीय उर्जेद्वारे अभिप्रेत आहे.

जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शक सूचना : उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापरगजानन मोहोड अमरावतीउपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामध्ये पाण्याचा दाब हा गुरूत्वाकर्षनीय उर्जेद्वारे अभिप्रेत आहे. मात्र विमोचकाखालील नलिकेद्वारे आता सुक्ष्म सिंचनाच्या धोरणाची स्वतंत्ररित्या आखणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सिंचनासाठी नलिका वितरण प्रणालीचा अवलंब करावा लागणार आहे. वितरण प्रणाली व सिंचन प्रणाली या दोन्ही भिन्न बाबी आहेत. वितरण प्रणालीद्वारे पाणी हे पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रापर्यंत पोहचविणे अभिप्रेत आहे. हे वितरण कालवा बांधकामाची स्थिती, भूसंपादनाची सद्यस्थिती, भुस्तर, भौगोलिक स्थिती व पिकरचना विचारात घेऊन प्रवाही कालवे व नलिकाद्वारे पाण्याचे वितरण होते. यामध्ये तुषार व ठिबक सिंचन असे सिंचनाचे प्रकार आहे. यापुढे नलिका वितरण स्वीकारले तरी सिंचनाची यापैकी कुठलीही एक पद्धती अवलंबिता येते. मात्र उपलब्ध पाणी व लागवडीलायक क्षेत्र विचारात घेता सिंचनाच्या संपूर्ण लाभक्षेत्रात सुक्ष्म सिंचनाचा अवलंब व्हावा, असे जलसंपदा विभागाचे उद्दिष्ट आहे. यासाठी सद्याची वितरण व्यवस्था सुक्ष्म सिंचनास पुरक अशी रुपांतरित करणे, यासाठी जलसंपदा विभागाद्वारा मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात आली आहे.लाभक्षेत्रातील जमिनीचा उतार तीव्र असल्यास कमी खर्चात नलिका वितरण प्रणाली संकल्पित करण्यास वाव असतो. यामध्ये जमिनीचा उतार १:५०० पेक्षा असल्यास गुरूत्वाकर्षणाचे उर्जेद्वारे नलिका वितरण करणे व्यवहार्य ठरते. जर लाभक्षेत्रातील जमिनीस मोठ्या प्रमाणावर चढ-उतार असल्यास कालवा बांधकामाचा खर्च वाढतो. तसेच शेतकऱ्यांवरील धबधब्याचा खर्च वाढतो. अशा प्रकरणी बंदीस्त नलिका वितरण हे फायद्याचे ठरते.खारपाणपट्ट्यात नियंत्रित सिंचनाची गरजपश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात संत्रा व अन्य फळबागांसाठी अत्यंत नियंत्रित सिंचनाची गरज आहे. जास्त पाण्यामुळे फळबागांची उत्पादकता कमी होते, अश्या लाभक्षेत्रासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा पर्याय आता अन्य निकषांच्या आधारे तपासून पाहण्यात येणार आहे.पारंपारिक वितरण प्रणाली ठरते महागनवीन प्रकल्पांच्या बाबतीत ज्या प्रकरणी पारंपारिक कालवा वितरण प्रणाली भूसंपादनाच्या खर्चामुळे महाग ठरते. अश्याप्रकरणी अन्य अभियांत्रिकी निकषानुसार नलिका वितरण तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत असल्यास अश्या ठिकाणीही नलिका वितरण व्यवस्था महत्वपूर्ण ठरणार आहे. व्यहनव्ययाची बचत, पाणीवापर कार्यक्षमतेत वाढनलिका वितरण प्रणालीमुळे व्यहनव्ययाची बचत होते व पाणी वापराची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे उपसा सिंचन योजनेमधील भांडवली गुंतवणुकीत तसेच वीज देयकाच्या खर्चात बचत होते. त्यामुळे नवीन उपसा सिंचन योजनेत नलिका वितरण व पारंपारिक वितरण प्रणालीचा तौलनिक अभ्यास करण्यात येणार आहे. काळ्या मातीच्या लाभक्षेत्रात फायद्याची प्रणालीकाळ्या मातीच्या कार्यक्षेत्रात पाया खोल जात असल्याने कालव्यावरील बांधकामाचा खर्च जास्त येतो. तसेच मुरुम जवळपास उपलब्ध नसल्यास मुरूम लादी भराव व अस्तरीकरणाचे कामाचा खर्च वाढतो. त्यातुलनेत नलिका वितरण प्रणाली ही फायद्याची ठरु शकते, असे मत जलसंपदाच्या अहवालात नमूद आहे.