पुन्हा होम डिलिव्हरी: जिल्हाधिकाºयांनी काढले आदेश
असाईनमेंट
प्रदीप भाकरे
अमरावती : डेल्टामुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली आहे. पुर्वीप्रमाणे होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २६ जुन रोजी संचारबंदी कालावधीतील निर्बंध जाहिर करणारे आदेश पारित केले. हे प्रतिबंधात्मक आदेश २८ जुन रोजी सकाळी ७ वाजतापासून अंमलात येणार आहेत. त्यात पुन्हा हॉटेलच्या वेळेला मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
बॉक्स
सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार
१) सोमवार ते शुक्रवार (नियमित) सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के आसनक्षमतेसह.
२) सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा
३) शनिवार व रविवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत पर्यंतघरपोच सेवा फक्त
४) हॉटेल, लॉजिंग, रेस्टारंट मध्ये एकूण क्षमतेच्या ३३ टक्यांपेक्षा जास्त क्षमतेने निवास करता येणार
----------------------
हॉटेल कर्मचाºयांचे आणखी हाल
‘हॉटेल्स बंद असल्याने मागील वर्ष अत्यंत हलाखीचे गेले. हॉटेल्समध्ये ग्राहक येतील, व्यवसाय होईल, तर आमचा खर्च मालकांना परवडेल, यंदा दोन महिन्यांपासून हॉटेल्स सुरू झाले असले तरी, कर्मचाºयांच्या संख्येत कपात करण्यात आली.
हॉटेल कर्मचारी
---------------
मागील वर्षी हॉटेल्स पुर्णत: बंद, तर यंदा होम डिलिव्हरी. हॉटेलमध्ये जसे ग्राहक येतात, तशा होम डिलिव्हरीच्या आॅर्डर होत नाहीत. झाल्याही तर, जेवण बनविणाºया व पोहोचवून देणाºयाच्या हातालाच काम. वेटर तर पार बुडाले. आता पुन्हा काम मिळेल, ही देखील शाश्वती नाही.
हॉटेल कर्मचारी
--------------
हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार
‘कोरोना संसर्ग, लॉकडाऊन, संचारबंदी अशा नानाविध संकटचा सर्वाधिक फटका बसला, तो हॉटेल्सचालकांना. त्यातही तालुकास्तरावरील हॉटेल व्यवसायिक पार बुडाले. मोठ्या शहरात होम डिलिव्हरीसाठी आॅर्डर मिळतात. पण आम्ही तर पुरते मेलो.
बिट्टू अकोलकर, हॉटेल व्यवसायिक
चांदूरबाजार
---------------
नवी पहाट म्हणून पुन्हा कामाला लागलो. गावखेड्यात परतलेल्या कर्मचाºयांना बोलावून घेतले. मात्र, आता पुन्हा नव्याने मर्यादा घालण्यात आल्या. त्याचा परिणाम व्यवसायासह होईल. पण, कोरोनाच्या तिसºया लाटेच्या नियोजनासाठी मर्यादा देखील आवश्यकच आहे.
रवींद्रसिंग सलुजा,
हॉटेल व्यवसायिक, अमरावती
--------------------