शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धामणगावात वाढली बहिणींची संख्या

By admin | Published: November 13, 2015 12:28 AM

‘गेली पुनवेची रात, आली भरात ग तीज, चंद्रमौळी झोपडीत माझ्या ओवाळते भाऊबीज’ या गीतासह शुक्रवारी आपल्या भावांना दीर्घायुष्य लाभो म्हणून प्रत्येक बहीण भावाला ओवाळणार आहे.

धामणगाव रेल्वे : ‘गेली पुनवेची रात, आली भरात ग तीज, चंद्रमौळी झोपडीत माझ्या ओवाळते भाऊबीज’ या गीतासह शुक्रवारी आपल्या भावांना दीर्घायुष्य लाभो म्हणून प्रत्येक बहीण भावाला ओवाळणार आहे. मागील दोन वर्षांचा विक्रम मुलींच्या जन्मदराने मोडला आहे़ शरद ऋुतूतील कार्तिक मासातील द्वितीया म्हणजे भाऊबीज. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखविणारा आहे़ बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन व्हावे, ही भाऊबिजेमागची भूमिका आहे़ ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातील प्रत्येक महिलेचे सरंक्षण निर्भयपणे करू शकतील, तो दिवस म्हणजे भाऊबीजेचा. या दिवशी यम हा त्याची बहीण यमुनेच्या घरी जेवायला गेला होता. म्हणून या दिवसाला यम द्वितीया असेही म्हटले जाते़ या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे केले जाते, अशीही आख्यायिका आहे़ एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर चंद्राला भाऊ म्हणून ओवाळून भाऊबीज साजरी करतात़ भाऊ-बहिणीच्या अतूट स्नेहाचे प्रतिक असलेल्या भाऊबीज या सणासाठी आनंदाची बाब म्हणजे तालुक्यात मागिल तीन वर्ष मुलींच्या घसरलेल्या जन्मदाराचा टक्का या एका वर्षात दुप्पटीने वाढला आहे़ आज एक हजार मुलांमागे ९६८ हा मुलीचा जन्मदर ग्रामीण भागातील जनजागृती व आरोग्य विभागाच्या सतर्क तेमुळे वाढला आहे़धामणगाव तालुक्यात मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, निंबोली, अंजनसिंंगी हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र येतात़ यात अठरा उपकेंद्र आहेत़ सन २०१४-१५मध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्रात २१७ मुलांनी व २९२ मुलींनी जन्म घेतला. विशेषत: ग्रामीण भागातील अठरा उपकेंद्रात ४७ मुलांनी तर ३५ मुलींनी या नव्या जगात प्रवेश घेतला़ ४९१ पैकी २६४ मुले व २२७ मुली यावर्षात जन्मल्या़ गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा, पहिल्या मुलाची आई असलेल्या दुबार गर्भवती महिलांकडे आरोग्यसेविकांच्यावतीने विशेष लक्ष देण्यात आले़ मुलापेक्षा मुलगी बरी, असा संदेश आरोग्य विभागाने घरोघरी पोहोचविला. त्याची फलश्रुती मुलींचा जन्मदर वाढविण्यात झाली.