इर्विन चौकात आंदोलन : परिचारिकांंना सेवेत नियमित करण्याची मागणी अमरावती : वर्षानुवर्ष आरोग्य विभागात काम करणाऱ्या परिचारिकांच्या सेवा तत्काळ नियमित करा व विशेष लेखी परीक्षा तत्काळ रद्द करा, यासह आदी मागण्यासाठी परिचारीकांनी बुधवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. या संपामुळे जिल्हाभरातील यामुळे शासकीय रुग्णालयाची आरोग्य सेवा प्रभावीत झाली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोशिएशनच्यावतीने हा संप पुकारण्यात आला. त्यामध्ये जिल्हाभरातील सुमारे ५०० परिचारिकांनी सहभाग नोंदविला. शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या या परिचारिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. मात्र, शासनाचे बेपर्वा धोरण आहे. त्यानुषंगाने बुधवारी परिचारिकांनी संप पुकारला असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालीटी, टी.बी. हॉस्पिटल, सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील सुमारे ४५० ते ५०० परिचारिका संपावर आहेत. बुधवारी इर्विन चौकातील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी इर्विन रुग्णालयाच्या अधिसेविका मंदा गाढवे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. हा संप असोशिएशन अध्यक्ष वर्षा पागोटे यांच्या नेत्तृत्वात असून यामध्ये उपाध्यक्ष वैशाली नगराळे, सचीव ललीता अटाळकर, मेघा चौबे,आशा दाभाडे, ज्योती तायडे, बबीता बागडे, लिला पळसोकार, सुलोचना हजबे, नंदा तेटू, मनीषा कांबळे, हर्षा उमक, रितू बैस, रोहीणी हाडोळे, प्रफुल्ला खडसे, ज्योती काळे, कांता रामटेके, सवीता झामरकर, ज्योती मोहोड, मुक्ता खोंड, माला गणोरकर, सविता गवई, सविता बदकुले, अश्विनी चव्हाण, प्रीती तायडे, ममता चव्हाण, सीमा डांगे, साधना काळे, मालती प्रधान, सुनंदा कुळकर्णी, अनिता खोब्रागडे आदि परिचारिकांचा सहभाग नोंदविला आहे.(प्रतिनिधी)
परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य सेवा प्रभावित
By admin | Published: June 16, 2016 12:31 AM