लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन दिवसांपूर्वी अकोल्याहून निघालेल्या ९२ वर्षीय कुसुमबाई यांना अखेर बुधवारी अमरावती येथील हमालपुरातील नातवाचे घर मिळाले. रॉयली प्लॉट परिसरातील व्यापारी राजेश गुल्हाने यांनी कुसुमबार्इंना माणुसकीचा आधार देऊन त्या वृद्धेला नातवाच्या घरापर्यंत पोहोचून दिले.व्यापारी राजेश गुल्हाने यांना त्यांच्या रॉयली प्लॉट परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानासमोर एक वयोवृद्ध महिला भटकताना आढळून आली. इकडे-तिकडे पाहत भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी ती मदतीच्या अपेक्षेने फिरताना राजेश यांना दिसली. त्यांनी वृद्ध महिलेची अवस्था पाहून तिला प्रेमळ भावनेतून आस्थेने विचारपूस केली. तिच्या बोलण्यातून त्यांचे नाव कुसुमबाई कावळे असल्याचे माहिती पडले. त्यांना काही आठवत नव्हते. तसेच अकोला व हमालपुरा येथील मोरे अडनाव तिच्या बोलण्यातून पुढे आले. वृद्धेच्या अंगावर सोन्याचे दागिने असल्यामुळे ते चोरी जाण्याची भीती होती. त्यामुळे राजेश यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना पाचारण करून वृद्धेची चौकशी केली. त्यानंतर राजेश व पोलीस कुसुमबार्इंना घेऊन हमालपुºयात पोहोचले. त्यांनी मोरे अडनावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. अर्ध्या तासानंतर कुसुमबाईच्या मुलीचा मुलगा, तिचा नातू नितीन मोरे मिळून आला. नितीन तीन दिवसांपासून आजीचा शोध घेत होता. आजीला पाहून त्यांना आनंद झाला.
भरकटलेल्या वृद्ध कुसुमबाईला अखेर मिळाले नातवाचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 1:36 AM
तीन दिवसांपूर्वी अकोल्याहून निघालेल्या ९२ वर्षीय कुसुमबाई यांना अखेर बुधवारी अमरावती येथील हमालपुरातील नातवाचे घर मिळाले. रॉयली प्लॉट परिसरातील व्यापारी राजेश गुल्हाने यांनी कुसुमबार्इंना माणुसकीचा आधार देऊन त्या वृद्धेला नातवाच्या घरापर्यंत पोहोचून दिले.
ठळक मुद्देमाणुसकीचा परिचय : अकोल्याहून निघाली होती वृद्धा