लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : पंचायत समितीच्या महिला व बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी येथील लहान बालकांच्या पोषण आहारात पोषक पौष्टिक शेवया देण्यात येतात, त्या पोषण आहारात चक्क बुरशीसह अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सांगळूद ग्रामपंचायतीच्या अंगणवाडीमध्ये दुपारी १२ वाजता उघडकीस आली. ग्रामपंचायतीने पोषण आहाराची पाकीटे जप्त केली आहेत.७० चिमुकल्यांच्या जीवाशी खेळतीन ग्रामपंचातींमध्ये या पाकीटांचे वाटप झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सदर आहाराची पाकीटे गुरूवारीच पंचायत समितीला प्राप्त झालीे. पंचायत समितीच्या महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणावाड्यात पोषण आहार देण्यात येतो. ६ महिने ते ३ वर्षापर्यंतच्या मुुलांना अंगणवाडीमध्ये सदर शेवयांचा पोषण आहार देण्यात येतो. सांगळूद येथील अंगणवाडीमध्ये ७० लहान मुले शिक्षण घेत आहे. अंगणवाडी शिक्षकेच्या सदर बाब लक्षात आली. यानंतर गावच्या सरपंच मंजुषा नवालकार यांनी सदर पाकीटांची पाहणी केली असता पाकीटामध्ये बुरशी लागलेली आढळली. अळ्या सुध्दा आढळल्याने एकच खळबळ उडाली. येथे उपस्थित चिमुकल्यांना सदर आहार देण्यात आला नव्हता. त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही. आहाराच्या पाकीटावरील ग्राहक संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता तो नंबर बंद होता. बीडीओने सदर आहाराची पाकीटे वापरू नये असे आदेश दिले आहे. महिला व बालविकास अधिकारी मीना देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पोषण आहार हा चिमुकल्यांना चांगले आरोग्य होण्यासाठी देण्यात येतो. पण जर आहारात अशाप्रकारे बुरशी व अळ्या आढळत असेल तर हा तर चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ आहे. हा आहार जर चिमुकल्यांच्या पोटात गेला असता तर त्यांना आजाराला सामोरे जावे लागले असते. संबधित नागपूर येथील त्या ओद्योगिक सहकारी संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सरपंच्यांनी बीडीओनांना सदर अळ्या असलेली पाकिटे दाखविली.
अंगणवाडीच्या पोषण आहारात बुरशी अन् अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:53 PM
पंचायत समितीच्या महिला व बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी येथील लहान बालकांच्या पोषण आहारात पोषक पौष्टिक शेवया देण्यात येतात, त्या पोषण आहारात चक्क बुरशीसह अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली.
ठळक मुद्देग्रामपंचायतीने केला साठा जप्त : सांगळूद येथील घटना