परतवाडा : तोंडगाव येथील अंगणवाडी केंद्रात नुकतेच पोषण अभियान राबविले गेले. याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थित गावातील गरोदर माता, स्तनदा मातांसह अन्य महिलांना पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले. जीवनसत्त्वाचे महत्त्व विशद करून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आवाहनदेखील उपस्थित महिलांना मान्यवरांनी केले. अभियानाचे उद्घाटन विस्तार अधिकारी दीपक निखाडे यांनी केले.
याप्रसंगी अचलपूर नगर परिषदेच्या माजी शिक्षण सभापती दीपाली विधळे, डॉ. रोशनी मळसणे, आरोग्य अधिकारी डॉ. संदेश तायडे, प्रकल्प अधिकारी दुर्गे आणि पर्यवेक्षिका वर्षा विघे यांनी उपस्थितांना विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आशा सेविका ताई चरपे, पंचफुला नांदणे, प्रतिभा मोरे, रमाबाई मोहने, प्रेमलता ठाकरे, मंदा साबळे, रंजना कडू, मायावती तंतरपाळे, सुमन मार्कंड, वर्षा ठाकरे, अनिता कडू, साक्षी ठाकरे, प्रतीक्षा तंतरपाळे यांच्यासह गावातील महिलांची उपस्थिती होती.