शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रस्त्यात वाहन लावून वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:09 AM

डीमार्टनजीक हातगाडीचालकावर कारवाई अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर हातगाडी नागरिकांच्या जीवितास ईजा होईल, अशा धोकादायक स्थितीत लावून गॅस सिलिंडरचा वापर ...

डीमार्टनजीक हातगाडीचालकावर कारवाई

अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर हातगाडी नागरिकांच्या जीवितास ईजा होईल, अशा धोकादायक स्थितीत लावून गॅस सिलिंडरचा वापर केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी बियाणी चौकातील डीमार्टनजीक युवकाविरुद्ध १६ जुलै रोजी कारवाई केली. अब्राम खान बाबर खान (३५, रा. चिलम छावणी) असे आरोपीचे नाव आहे.

---------------------

रस्त्यात हातगाडी, युवकाविरुद्ध गुन्हा

अमरावती : शिवाजीनगर जुने पोस्ट ऑफिसनजीक वर्दळीच्या मार्गावर हातगाडी लावून धोकादायक स्थितीत व्यवसाय करताना आढलेल्या युवकाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी १७ जुलै रोजी गुन्हा नोंदविला. शेख वसीम शेख नसीर (२४, रा. चिलम छावणी) असे आरोपीचे नाव आहे.

------------------

विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन करीत विनापरवानगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमावाने आंदोलन केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दराच्या ४० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई गाडगेनगर पोलिसांनी १७ जुलै रोजी केली. यामध्ये अनिल साहू, विपीन गुप्ता, बंटी पारवानी, चेतन वाटणकर, संतोष गहरवार, दिनेश सिंह व ३५ कार्यकर्त्यांना आरोपी केले आहे.

------------------------

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक

अमरावती : भरधाव चारचाकी वाहन एमएच २७ - ७०८६ च्या चालकाने दुचाकीस्वाराला मागून धडक देऊन जखमी केले. ही घटना १७ जुलै रोजी साईनगर चौकात घडली. विशाल रवींद्र गवई (२८, रा. बडनेरा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या चारचाकी वाहनधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

जवादे हाॅस्पिटलसमोरून तडीपारास अटक

अमरावती : दोन वर्षांकरिता सिटी कोतवाली पोलिसांनी तडीपार केलेला आरोपी विनापरवानगी शहरात फिरताना १७ जुलै रोजी पेट्रोलिंगदरम्यान जवादे हॉस्टपिटलसमोर आढळून आला. रतन वसंतराव उके (३६, राजमातानगर) असे तडीपाराचे नाव आहे.

--------------

कापड दुकानादाराविरुद्ध कारवाई

अमरावती : संचारबंदीचे उल्लंघन करीत उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी नमुना गल्लीतील कापड व्यावसायिकाविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मो. इदरीस मो. सुलतान (३०, रा. छायानगर) असे त्याचे नाव आहे. १७ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली.

------------------------

सहा गोवंशाची गौरक्षणात रवानगी

अमरावती : चारचाकी वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा जणावरांसह सदर वाहन नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती त्या जनावरांची दस्तूरनगरातील गौरक्षण संस्थेच रवानगी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ही कारवाई भातकुली तालुक्यातील अळणगाव येथे १६ जुलै रोजी भातकुली पोलिसांनी केली.

-------------