अमरावती: वाहन चालविताना विना मास्क वाहन चालविणे, तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर फिरणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग न ठेवणे या प्रकरणी सात पोलीस ठाणे हद्दीतील ४२ जणांवर व्हॅलेटाईन डेच्या दिवशी रविवारी भादविची कलम १८८ व अन्य कलमान्यवे गुन्हा नोंदविण्यात आला.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महसूल, महापालिका व पोलीस प्रशासन अर्लट झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन अधिनिमन २००५ कलम ३,४, साथीचा अधिनियम १८९७ या कायद्याची कडक अंमलबजवणी करण्याचे निर्देश आहे. त्याअनुषंगाने आता पोलीस विभागाच्यावतीने नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. त्यानुषंगाने रविवारी शहरभर कारवाई करण्यात आली. याममध्ये राजापेठ पोलीस ठाण्यात १२, सिटी कोतवाली दोन, भातकुली दोन , फ्रेजरपुरा सात, बडेनरा एक, गाडगेनगर सर्वाधिक १७, तर वलगाव एक अशा ४२ नागरिकांवर कलम १८८ व अन्य कलमानव्ये गुन्हा नोंदविला आहे. नागरिकांवर थेट गुन्हाच दाखल करण्यात येत असल्याने नागरिकांनी शहरत विना मास्क फिरू नये, पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये, हा मॅसेज पोलिसांनी दिला आहे.