शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कार्यालय, शाळा की धर्मशाळा ?

By admin | Published: October 04, 2016 12:22 AM

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अख्त्यारित असलेल्या राजापेठ स्थित शाळेची अवस्था ‘नादार’ झाली आहे.

महापालिकेतील गौडबंगाल : अनधिकृत ताबेदारांना अभय का ?अमरावती : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अख्त्यारित असलेल्या राजापेठ स्थित शाळेची अवस्था ‘नादार’ झाली आहे. येथील शाळा कधीचीच बंद पडली असून तळमजल्यात बाजार व परवाना विभागाचे कार्यालय थाटण्यात आले आहे. मात्र पहिला मजला एका पदाधिकाऱ्याने अनधिकृतपणे ताब्यात ठेवल्याने ही शाळा की धर्मशाळा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. राजापेठकडून रेल्वे क्रॉसिंग पार केल्यानंतर श्रीराम मंदिराच्या समोरासमोर महापालिकेच्या मालकीच्या शाळेची दुमजली इमारत आहे. मात्र या शाळेच्या इमारतीत शाळा भरणे कधीचेच बंद झाले आहे. तद्नंतर टाऊन हॉलमध्ये असलेले बाजार व परवाना विभागाचे कार्यालय तेथे स्थलांतरित करण्यात आले. या दुमजली शाळा इमारतीच्या तळमजल्याचा वापर बाजार व परवाना विभागाच्या अधीक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन उपयोगासाठी केला जातो. या इमारतीत बाजार व परवाना विभागाचे कार्यालय असले तरी या इमारतीचे पालकत्व शिक्षण विभागाकडे आहे. राजापेठस्थित शाळा इमारतीचा पहिला मजला कार्यालयीन उपयोगासाठी सत्कारणी लागला असला तरी पहिल्या मजल्यावरील विस्तीर्ण जागेत आनंदीआनंद आहे. व्यापक क्षेत्रफळाच्या एका खोलीत हेल्थसेंटरचे मोठे भंगार येथे ठेवण्यात आले आहे. हेल्थ क्लबसाठी उपयोगात येणाऱ्या मशिन्सचे सांगाड्यांनी ही एक खोली व्यापली आहे. दुसऱ्या एका खोलीतसुद्धा एका वृद्ध महिलेचे वास्तव्य आहे. या दुसऱ्या खोलीतही हेल्थ क्लबमधील काही भंगार यंत्रे धूळखात पडली आहेत. या खोलींचा ताबा एका पदाधिकाऱ्याकडे आहे. त्यानेच या इमारतीचे हक्क राखून ठेवल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)यंत्रणेवर कुणाचा दबाव ?बाजार व परवाना विभागाचे कार्यालय असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भंगारासह अन्य साहित्याचे आणि रहिवासाचे हक्क तेथीलच एका लोकप्रतिनिधीने राखून ठेवल्याने या अनधिकृत प्रकारावर कुणीही ‘ब्र’ काढायला तयार नाही. यंत्रणेवर त्या व्यक्तीचाच अनामिक दबाव असल्याचे यंत्रणेतील उच्चपदस्थ अनौपचारिकरित्या कबूल करतात. त्यामुळे ही शाळा की धर्मशाळा? असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. संपर्क कार्यालयासाठी मागितली होती जागाजिल्ह्यातील एका विद्यमान लोकप्रतिनिधीने या इमारतीतील पहिला मजला संपर्क कार्यालयासाठी मागितला होता. तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी तशी चाचपणी सुद्धा केली होती. मात्र अनामिक दबावामुळे ते साध्य होवू शकले नाही. त्यानंतर भंगारावस्थेत पडलेल्या त्या विस्तीर्ण जागेत ‘पीएम आवास योजनेचा कक्ष वजा कार्यालय कार्यान्वित करणे प्रस्तावित आहे. आयुक्तांचा लक्षवेधमहापालिका आयुक्त राजकीय दबावाला बळी न पडता निर्णय घेतात, असे पालिका यंत्रणेतून सांगितले जाते. त्यामुळे आयुक्त हेमंत पवार यांनी या शाळेच्या इमारतीवरील अनधिकृत ताबेदारांना तंबी देऊन ही सार्वजनिक मालमत्ता नियंत्रणमुक्त करावी, अशी सूचना दिली आहे. त्या खोलीमधील भंगार व अन्य अतिक्रमणाला कुठलेच आयुक्त ‘ब्रेक’ लावत नाहीत, अशी वंदता आहे. त्यामुळे पवारांच्या भूमिकेवर यंत्रणेसह सर्वसामान्य अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.