शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

अधिकारी गैरहजर, पालकमंत्री संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:19 AM

पंचायत समितीच्या शुक्रवारी आयोजित मासिक सभेला विविध विभागांचे अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने संतप्त सभापती-उपसभापती सदस्यांनी

चिखलदऱ्याची सभा : सभापती, सदस्यांचा पं.स.च्या बैठकीवर बहिष्कारलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पंचायत समितीच्या शुक्रवारी आयोजित मासिक सभेला विविध विभागांचे अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने संतप्त सभापती-उपसभापती सदस्यांनी बहिष्कार टाकला व पक्षीय बैठकीला येथे आलेले पालकमंत्री प्रवीण पोटे यांना भेटून निवेदन दिले. त्यावर पालकमंत्री चांगलेच संतापले.शुक्रवारी दुपारी १ वाजता चिखलदरा पंचायत समितीची मासिक सभा ठेवण्यात आली होती. तालुक्यातील संपूर्ण कामांचा, शासनाच्या विविध योजनांचा आढावा, नवीन आदेश, सूचना वजा आदिवासींच्या समस्यांसाठी संबंधित विभाग प्रमुखांसोबत ही बैठक ठेवण्यात आली होती. जवळपास २८ विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थि राहणे अपेक्षित होते. मात्र १० विभागांचे अधिकारी फिरकलेच नाहीत. परिणामी सभापती कविता काळे, उपसभापती नानकराम ठाकरे, सदस्य बन्सी जामकर, रंगलाल जामूनकर, रामकली भुसूम, प्रमिला कास्देकर आदींनी पं.स. बैठकीवर थेट बहिष्कार टाकला आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली. तसे निवेदन जि.प.च्या सीईओंना पाठविण्यात आले आहे.सहा महिन्यांपासून आहेत बेपत्ताजवळपास १० यंत्रणांचे अधिकारी मागील सहा महिन्यांपासून पंचायत समितीच्या मासिक सभेला आलेच नाही. त्यांना वारंवार बैठकीला हजर राहण्याचे पत्रसुद्धा देण्यात आले, तरीही त्याला न जुमानता हेतूपुरस्सर गैरहजर राहिल्याने संतप्त सदस्यांनी शुक्रवारी बैठकीवरच बहिष्कार टाकला.हे आहेत बेपत्ता?सतत मासिक बैठकीचे पत्र पाठवूनसुद्धा अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चिखलदरा, उपकार्यकारी अभियंता विद्युत विभाग, जीवन प्राधिकरण, तालुका कृषी अधिकारी, उपअभियंता बांधकाम विभाग जि. प., प्रकल्प अधिकारी, लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण, उपवनसंरक्षक व्याघ्र प्रकल्प, वनपरिक्षेत्र अधिकारी अकोट, जि. प. सिंचन विभाग, मग्रारोहयोग, सेल आदींचा समावेश आहे.सर्व यंत्रणेला बैठकीचे पत्र देण्यात आले. मात्र मागील सहा महिन्यांपासून सतत गैरहजर असल्याने सभापती, उपसभापती सदस्यांनी बहिष्कार टाकला.- ए.एन. अलोने, बीडीओ, चिखलदरावारंवार पत्र देऊनसुद्धा बैठकीला हजर न राहणे, हा आदिवासी पदाधिकाऱ्यांसह घटनेचा अवमान आहे. अधिकारी नसल्याने आढावा कशाचा घ्यायचा? सहा महिन्यांपासून अनुपस्थित राहिल्याने बहिष्कार टाकला.- कविता काळे, सभापती, पं.स.