लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील बहुतांश अधिकाºयांवर सत्ताधिशांचा वचक राहिलेला नाही. स्थायी समिती या स्वतंत्र प्राधिकरणाच्या प्रत्येक बैठकीला उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयांसह अन्य अधिकारी व विभागप्रमुखांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तथापि, या आर्थिक बैठकीला काही अधिकारी-कर्मचारी दांडी मारत असल्याचे निरीक्षण नोंदविल्या गेले आहे.महापालिका या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमसभा, स्थायी समिती व आयुक्त ही स्वतंत्र प्राधिकरणे आहेत. स्थायीच्या साप्ताहिक बैठकीत आर्थिक बाबींच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी दिली जाते. तूर्तास स्थायीचे सुकाणू तुषार भारतीय यांच्याकडे आहे. स्थायीच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. एखाद्या प्रकल्पाला आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर स्थायी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करते. त्यानंतरच संबंधित प्रकल्पाचा करारनामा व कार्यारंभ आदेशाची वाट प्रशस्त होते. मात्र, मागील बैठकीपासून काही अधिकारी स्थायीच्या बैठकीला दांडी मारत असल्याचे दिसून आले आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीला अतिरिक्त कंत्राटी शहर अभियंता जीवन सदार यांच्यासह अन्य काही अधिकारी अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचले. स्थायी समितीची सभा दुपारी ४ वाजता आहे, हे माहीत असताना सदार अन्य काही अधिकाºयांना घेऊन गणेश विसर्जनासाठी छत्रीतलावाची पाहणी करण्यास गेले. सोबत अन्य अधिकाºयांनाही घेऊन गेले. त्यामुळे सभापती तुषार भारतीय यांनी त्यांना विचारणा सुद्धा केली. तथापि गणेश विसर्जनासंदर्भात आपण छत्री तलाव आणि प्रथमेश तलावाकडे गेलो असल्याची माहिती स्थायी सभापतींना देण्यात आली. त्यावर बैठकींना उपस्थित राहणे अनिवार्य असल्याची सूचना भारतीय यांनी केली. दांडी किंवा लेटलतिफी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच त्यांनी अप्प्रत्यक्षरित्या देऊन टाकला. तथापि काही विषय समित्यांच्या बैठकीकडे अनेक अधिकारी करीत असलेला कानाडोळा सत्तांधिशांचा प्रशासनावर वचक नसल्याचे द्योतक ठरला आहे. सत्तेतील अन्य पदाधिकाºयांच्या तुलनेत दोन माजी महापौरांचा प्रशासनावरील वचक वाखाणण्याजोगा आहे. सत्तेच्या परिघात नव्याने दाखल झालेल्या एका स्वीकृत सदस्यासमोरही अधिकाºयांची पाचावर धारण बसते. मात्र, सत्ताधीश तो वचक ठेवू शकत नसल्याचे वास्तव आहे. महापालिकेतील एक कंत्राटी अधिकारी स्वत:ला ‘सुपर कमिश्नर’ म्हणून ‘ट्रीट’ करीत असल्याची तक्रारही यानिमित्ताने समोर आली आहे.अन्य बैठकींकडेही पाठस्थायी समितीच नव्हे, तर अन्य समितीच्या बैठकांकडेही काही अधिकारी, विभागप्रमुख पाठ फिरवित असल्याची तक्रार आयुक्तांपर्यंत करण्यात आली आहे. शहर सुधार समितीच्या एका बैठकीला एडीटीपी सुरेंद्र कांबळे यांनी दांडी मारल्याची तक्रार सबंधित सभापतींनी केली होती. विशेष म्हणजे ते त्यावेळी त्यांच्याच दालनात बसून होते. तरीही हेतुपुरस्सरपणे आले नसल्याची ती तक्रार होती.स्थायी समितीसोबतच इतर अन्य सर्व समितीच्या बैठकींना पूर्वतयारीसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे. चार दिवसांपूर्वीच्या स्थायी समितीच्या बैठकीला काही अधिकारी उशीरा येणार असल्याची पूर्वसूचना मला देण्यात आली होती.- तुषार भारतीय, स्थायी समिती सभापती
अधिकारी सत्ताधिशांवर वरचढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 9:59 PM
महापालिकेतील बहुतांश अधिकाºयांवर सत्ताधिशांचा वचक राहिलेला नाही.
ठळक मुद्देस्थायीच्या बैठकीत लेटलतिफी : विषय सभापतींचा त्रागा