महसूल उत्पन्न : प्रशासकीय यंत्रणा, मानव संसाधनविषयी मार्गदर्शनअमरावती : नागरी विकास संशोधन, हैद्राबाद या संस्थेद्वारा महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. सर्वप्रथम स्थायी समिती सभापती विलास इंगोले, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दीप प्रज्ज्वलन करून व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस हारार्पण करून प्रशिक्षणास सुरूवात करण्यात आली. पहिल्या सत्रात प्रशिक्षक नरेंद्रकुमार अष्टीकर, उपआयुक्त (सेनि) मालेगाव मनपा यांनी शहर नियोजनातून महसूल उत्पन्न, प्रशासकीय यंत्रणा व आस्थापना व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर आपले विचार व्यक्त केले. कायद्याच्या बाजू काय हे पण त्यांनी समजावून सांगितले. सदस्याच्या प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तरे दिली. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन स्थायी समिती सभापती विलास इंगोले, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले. दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक पी. नरसिंगराव (डायरेक्टर, नागरी विकास संशोधन, हैदराबाद) यांनी मानव संसाधन, प्रशासकीय बाबी व अडचणी या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या जीवनातील अनेक अनुभव यावेळी सांगितले. २९ नोव्हेंबरला पहिल्या सत्रात घनकचरा व स्वच्छता व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून स्वच्छता विषयक बाबी, पाणी पुरवठ्याचे नियोजन व देखभाल आणि पाणी पुरवठ्याचे नवीन प्रकल्प या तीन विषयाची मांडणी केली जाणार असून त्यासाठी मुंबईच्या एसडब्ल्यूएमचे सल्लागार अजित साळवी, पी. नरसिंगराव, मुंबई (सेवानिवृत्त अभियंता) आनंद देवधर व उपअभियंता मनोहर सोहनी या विषयांची मांडणी करणार आहेत. सदर प्रशिक्षणास आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसेवक राजेंद्र महल्ले, जावेद मेमन, उपआयुक्त विनायक औघड, उपआयुक्त चंदन पाटील, मुख्य लेखापाल प्रेमदास राठोड, ससनर सुरेंद्र कांबळे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, सहा. आयुक्त राहुल ओगले, योगेश पिठे, नरेंद्र वानखडे, प्रणाली घोंगे, प्रवीण इंगोले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्यामसुंदर सोनी, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर अलुडे, विधी अधिकारी श्रीकांत चौहान, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, संगणक कक्ष प्रमुख अमित डोंगरे, जकात अधीक्षक सुनील पकडे, उपअभियंता कार्यशाळा हनवने, अजय जाधव, सचिन बोंद्रे, उपअभियंता अशोक देशमुख व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन नगरसचिव मदन तांबेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
By admin | Published: November 30, 2015 12:29 AM