परतवाडा : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात जबाबदार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एस. रेड्डीची पाठराखण करणाऱ्या आरएफओ तथा अन्य वन कर्मचाऱ्यांना मेळघाटात फिरू देणार नसल्याचा इशारा युवक काँग्रेसच्यावतीने एका पत्राद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन बलप्रमुख यांना एका पत्राद्वारे देण्यात आला.
आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाला संपूर्णपणे डीएफओ विनोद शिवकुमार जबाबदार असून, त्याला अटक झाली आहे. सबब प्रकरणात एस. एम. रेड्डीसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. मात्र, मेळघाट टायगर रिझर्व्हमध्ये कार्यरत काही आरएफओ व वनकर्मचाऱ्यांनी खासदार नवनीत राणांकडे निवेदन देऊन रेड्डी निर्दोष असल्याची पाठराखण केली आहे. कुणीही या दोषी अधिकाऱ्यांची पाठराखण करीत असेल, तर अशांचा युवक काँग्रेसच्यावतीने निषेध करीत, त्यांना मेळघाटात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा युवक काँग्रेसचे मेळघाट विधानसभेचे उपाध्यक्ष पीयूष मालवीय यांनी मुख्य वनसंरक्षक तथा वन बलप्रमुख यांना एका पत्राद्वारे दिला आहे.
---------