वरूड : लॉकडाऊनच्या काळात बेनोडा नजीकच्या लोणी फाट्यावरील एका बार रेस्टारंटमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी ओली पार्टी झोडल्याची खमंग चचार् येथे आहे. माहिती मिळताच निघालेल्या वरूड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी येताच तेथील सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर काढून तो गायब करण्यात आला.
प्राप्त माहिती नुसार वरुड अमरावती रस्त्यावरील लोणी फाट्यावर एक बार रेस्टारंट असून रविवारी दुपारी १.३० च्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी तेथे ओली पार्टी करीत होते. संचारबंदी आणि जमाव बंदी तसेच लॉक डाऊनचे नियम धाब्यावर बसवून ती पार्टी सुरु होती . हा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला. जेवणासह दारूची पार्टी कशी सुरु असे विचारताच सर्वजण निघून गेले. तर या वेळी जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकार्याना संबंधितांनी मोबाईलवरून माहिती दिली असता तुम्ही तक्रार करा आम्ही कारवाई करतो असा सल्ला देण्यात आला. वरुडचे दुय्यम ठाणेदार सुनील पाटील यांनी बारमध्ये जाऊन चौकशी केली असता सीसीटीव्हीचा डीव्हीआर दुरुस्तीला नेल्याचे बारव्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तर तहसीलदार किशोर गावंडे यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली परंतु बार बंद करून बारमालकाने तो मी नव्हेचची भूमिका घेतली. स्वत:चा बचाव करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कर्मचाऱयांनी एका कारमधून पळ काढला.
कोट
माहिती मिळाल्यानंतर बार रेस्टारंटमध्ये गेलो. तेथे जेवायचे व इतर साहित्य आढळून आले. तर सिसिटीव्ही दुरुस्तीला नेल्याचे सांगितले. परंतु आम्ही सर्व तपास करून नियमानुसार कारवाही करू.
सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरूड
प्रत्यक्षदशीर्ने केली तक्रार
या घटनेची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना दिल्यानंतर तुम्ही तक्रार करा, आम्ही कारवाही करतो असा सल्ला दिल्याने प्रत्यक्षदर्शी निलेश लोणकर यांनी वरुड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असून या तक्रारींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.