शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

गुजरातचे दीड क्विंटल प्लास्टिक अमरावतीत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:06 PM

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गुजरातच्या अहमदाबादवरून अमरावतीत दाखल झालेला ट्रकला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पकडून तब्बल १ हजार ५०० किलोचा ...

ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस प्रशासनाचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुजरातच्या अहमदाबादवरून अमरावतीत दाखल झालेला ट्रकला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पकडून तब्बल १ हजार ५०० किलोचा प्लास्टिकचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी दुपारी महापालिकेच्या पथकाने शहरातील एका गॅरेजमध्ये ही कारवाई केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.अमरावती महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस विभाग यांनी गोपनीय माहितीवरून संयुक्तरीत्या शहरातील मोरबाग स्थित गुजरात ट्रान्सपोर्टवर धाड टाकली. त्या ठिकाणी उभे असलेले चारचाकी वाहन क्रमांक एमएच २७ एक्स ४६२३ मध्ये प्लास्टिक पन्नीचा मोठा साठा आढळून आला. महापालिकेने त्या प्लास्टिक पन्नीचे मोजमाप केले असता, तो माल १ हजार ५०० किलो असल्याचे स्पष्ट झाले. त्याची किंमत लाखो रुपयात असल्याचे निदर्शनास आले. महापालिका अधिकाऱ्यांनी त्या वाहनातील १ हजार ५०० किलोच्या प्लास्टिक पन्नीचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय महापालिकेने परफेक्ट फॅशन व रॉयल ट्रान्सपोर्ट येथे धाड टाकून ८० किलो प्लास्टिक चमचे जप्त केला. महापालिकेने परफेक्ट फॅशन, रॉयल ट्रांन्सपोर्ट व गुजरात महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड केला. या कारवाईत महापालिका उपायुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र्र वानखडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी स्वप्निल लिंगडे, क्षेत्र अधिकारी अरतपायरे, सहायक आयुक्त तौसिफ काझी, मनपाचे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक आय.आर. खान, प्रल्हाद राऊत, विकी जेदे, राजेश राठोड, ए.एम. सैयद, मनीष नकवाल, मोहीत जाधव, दिलीप बोयत व पोलीस विभागाचे कर्मचाºयांचा सहभाग होता.खर्रा पन्नी साईबाबा ट्रेडर्सच्याप्लास्टिकबंदीनंतरही त्याचा वापर करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी महापालिकेने मोरबाग येथील गुजरात ट्रान्सपोर्ट येथील वाहनातून प्लास्टिक पन्नीचा मुद्देमाल जप्त केला. त्या पन्न्या पानटपरीवर मिळणाऱ्या खऱ्यासाठी उपयोगात पडतात. साईबाबा ट्रेडर्सचे श्यामकुमार मोटवाणी यांचा तो मुद्देमाल असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.गुजरात राज्याच्या अहमदाबादावरून प्लास्टिकचा मुद्देमाल अमरावतीपर्यंत आणला गेला. तो माल पकडून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.- नरेंद्र वानखडे,उपायुक्त, महापालिका.