शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
5
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
6
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
7
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
8
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
9
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
10
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
12
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
13
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
14
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
15
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
16
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
17
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
18
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
19
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
20
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

मेळघाटात तेंदूपत्ता संकलनासाठी एक कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 5:00 AM

राज्यपालांनी पारित केलेल्या अधिसूचनेप्रमाणे गौणवनोपजमध्ये तेंदू पत्त्याचाही समावेश आहे. ग्रामसभा व ग्रामपंचायतींना सर्व प्रकारचे गौणवनोपज गोळा करण्याचे अधिकार मिळाले. तसेच अनुसूचित जमती व इतर पांरपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ अनुसार तेंदुपत्ता विक्रीच्या कार्यवाहीचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे४५ ग्रामसभांचा सहभाग : शबरी विकास महामंडळाकडून निधी वितरित

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटात तेंदू पत्ता संकलन, व्यवस्थापनासाठी ४५ ग्रामसभांंना १ कोटींचा निधी मिळाला. यंदा तेंदू संकलनासाठी शबरी विकास महामंडळाकड़ून खेळता निधी देण्यात आला असून, आदिवासींना रोजगाराचे दालन उपलब्ध होणार आहे.राज्यपालांनी पारित केलेल्या अधिसूचनेप्रमाणे गौणवनोपजमध्ये तेंदू पत्त्याचाही समावेश आहे. ग्रामसभा व ग्रामपंचायतींना सर्व प्रकारचे गौणवनोपज गोळा करण्याचे अधिकार मिळाले. तसेच अनुसूचित जमती व इतर पांरपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ अनुसार तेंदुपत्ता विक्रीच्या कार्यवाहीचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. हल्ली कोरोना विषाणूमुळे लाकडाऊन आहे. त्यामुळे तेंदू पत्ता संकलन निविदा प्रकिया राबविली नाही. परिणामी तेंदू पत्ता संकलन व आदिवासी कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध झाला नाही. परिणामी धारणी येथील एकात्मक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत अचलपूर तालुक्यातील ग्रुप आॅफ ग्रामसभा पायविहीर यांना तेंदू संकलन, व्यवस्थापनासाठी खेळते भांडवल म्हणून आर्थिक सहाय्य करण्यासाठी १ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी आर्थिक वर्षाअखेर शबरी विकास महामंडळास परत द्यावा लागणार आहे. हा निधी बिनव्याजी कामासाठी वापरता येईल. हे खेळते भांडवल महामंडळाचे शाखा व्यवस्थापक व ग्रामपंचयतीचे ग्रामसेवक अथवा सामूहिक वन हक्क समितीचे अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने बँकेत खाते उघडून जमा करावे लागेल. निधीच्या व्यवस्थापनासाठी सनियंत्रण समिती असणार आहे.पाच ते सहा हजार आदिवासींना रोजगारमेळघाटात तेंदूपत्ता संकलन आणि व्यवस्थापनातून पाच ते सहा हजार आदिवासी बांधवांना रोजगार मिळाण्याची आशा पल्लवीत झाली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी मजुरी ही वनविभागाच्या प्रचलित दरापेक्षा कमी असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.यंदा लॉकडाऊनमुळे तेंदूपत्ता संकलनासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविता आली नाही. आदिवासी बांधवांना रोजगाराचे साधन उपलब्ध करण्यासाठी तेंदूपत्ता संकलनाची जबाबदारी ग्रामसभांवर सोपविली आहे.- प्रवीण चव्हाण,मुख्य वनसंरक्षक, अमरावती प्रादेशिक.

टॅग्स :forest departmentवनविभाग