गजानन मोहोड - अमरावतीमतदारांच्या हातात मतदार चिठ्ठी (व्होटर स्लीप) देण्याचा उपक्रम तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून आयोगाने सुरू केला. या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराऐवजी आयोगाच्या मतदार चिठ्ठी वाटपाला प्रारंभ झालेला आहे. मतदानाला केवळ १ दिवस बाकी असताना अद्याप काही भागात चिठ्ठ्यांचे वाटप व्हायचे आहे. एक दिवसाच्या अवधीत मतदार चिठ्ठी वाटपाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान बीएलओ (बुथ लेव्हल आॅफिसर) यांच्यासमोर आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचे छायाचित्र असणारी मतदार चिठ्ठी निवडणूक विभागाद्वारा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील २५१७ मतदान केंद्राचे अधिकारी यांनी मतदारचिठ्ठीचे वाटप करणे सुरू केले आहे. आठही विधानसभा मतदारसंघांत २२,२१,६२४ मतदार आहेत. विधानसभा संघनिहाय पाहता धामणगाव २,९०,३५०, बडनेरा ३१२७६०, अमरावती २८५३२०, तिवसा २७०१३९, दर्यापूर २८०६२२, मेळघाट २५७९९९, अचलपूर २५२८६१, मोर्शी २६५४०९ अशी मतदारसंख्या असून यामध्ये महिला मतदारांचाही समावेश आहे. या मतदारांना मंगळवार १४ आॅक्टोबरपर्यंत मतदार चिठ्ठी पोहचविण्याचे महत्कार्याचे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना डोकेदुखीयापूर्वी राजकीय पक्षांद्वारा मतदारांच्या घरोघरी चिठ्ठ्या वाटप करण्यात येत होत्या. परंतु त्यावर उमेदवाराचे नाव व चिन्ह राहत असल्याने आयोगाने स्वत: हा उपक्रम राबविला. परंतु मतदारांपर्यंत चिठ्ठ्या पोहचल्या नसतील अशांचा यादीत नाव पाहताना मतदान केंद्रावर गोंधळ होण्याची शक्यता आहे, असे झाल्यास मतदान केंद्र कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. मतदार स्लिपवरही आहे माहितीजिल्ह्यात वाटण्यात येणाऱ्या मतदार चिठ्ठीमध्ये मतदारांचे नाव, छायाचित्र, मतदार यादीमधील क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदारांचे वय, लिंग व अन्य माहिती राहणार आहे.
एक दिवस हाती, मतदार चिठ्ठ्यांचे वाटप बाकी
By admin | Published: October 13, 2014 11:16 PM