आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या निर्देशाप्रमाणे महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाच्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या आहेत. त्यांचे निराकरण करावे यासाठी बुधवारी महसुल कर्मचाऱ्यांनी धरणे दिली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. महसूल कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्यामध्ये नायब तहसिलदार पदाला राजपत्रीत अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला असून ग्रेड पे मात्र वर्ग तीन पदाचा देण्यात आला. त्यामुळे ग्रेड पे वाढवून देण्यात यावा, महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम बदलून त्याला महसूल सहायक असे पदनाम देण्यात यावे, महसूल विभागातील चतुर्थ कर्मचारी हे सेवाकाळापासून सेवानिवृत्त सेवानिवृत्ती पर्यत एकाच पदावर कार्यरत राहत असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे एका मुलाला खात्यात नोकरीसाठी विचार करण्यात यावा, नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावे, लोकसेवा आयोगाप्रमाणे नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पदांसाठी गृहविभागाप्रमाणे याच धर्तीवर महसूल विभागाताच टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात, कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा अशा २६ मागण्यासाठी धरणे देण्यात आले. आंदोलनात के. एस. रघुवंशी, जीवन देशमुख, नामदेव गडलिंग, विजय मांजरे,, सुशील पवार, नकुल आळे, सुजीत सरोदे, मुन्ना ठाकूर, श्याम मिश्रा, विनोद भगत, मंगेश माहूलकर, अरूण बोंदरे, अविनाश हाडोळे, सुशील काशीकर, बाळू गंधे, देवराव सोनोने, अरूण भारती, विजय कायंदे, अमर वानखडे, अभिजित पुराणिक, रोहिणी गव्हाणे, टिना चव्हाण, लता बोरेकर, रेखा फसाटे, स्वाती बहिरे, मंगला भापकर, अरूणा ओगले, छाया राऊत, स्वाती चावडीपांडे, लता पुंड, राखी शर्मा आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
महसूल कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय धरणे
By admin | Published: April 21, 2016 12:04 AM