अमरावती : पावसाळ्यात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांद्वारे नागरी वस्तीमध्ये सापांचा शिरकाव मोठ्या संख्येने होत आहे. वॉर या वन्यजीवप्रेमी संस्थेने रविवारी एकाच दिवशी तीन ठिकाणाहून कोब्रा या विषारी जातीचे सात साप पकडले. त्यांना जंगलास सोडून जीवदान देण्यात आले.वॉरच्या सदस्यांना रविवारी सकाळी प्रथम एमआयडीसी परिसरातील मालपाणी मिलमध्ये कोब्रा नाग निघाल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच एमआयडीसी परिसर गाठला. त्या ठिकाणी एक नाग पकडल्यानंतर आणखी दोन मिळून आले. त्यानंतर कैलास इंडस्ट्रीजमधून त्यांना कॉल मिळाला. तेथून त्यांनी एक साप तसेच अन्य एका इंडस्ट्रीजमधूनही साप पकडण्यात आला. त्यानंतर चपराशीपुरा या नागरी वस्तीतून साप पकडण्यात आला. या सापांची नोंद वनविभागात करून वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना छत्रीतलाव परिसरातील जंगलात सुरक्षित सोडण्यात आले.वनरक्षक नीलेश करवाळे, राम राठोड तसेच वॉर संस्थेचे नीलेश कुरवाळे, अभिजित दाणी, कुंवरचंद श्रीवास, तुषार इंगोले, गुणवंत पाटील, प्रतीक माहुरे आदी यावेळी उपस्थित होते.सावधगिरी बाळगापंचवटी चौक परिसरातील गणेशदास राठी विद्यालयाच्या पटांगणात मुले खेळतात. तेथे शनिवारी कोब्रा आढळून आला. शिक्षकांच्या समयसूचकतेने सर्पमित्र लगेच पोहोचून नागाला पकडून सुरक्षित जंगलात सोडले. परदेशी ढाब्यावर भलामोठा अजगर शुक्रवारी मिळून आला.वॉर संस्थेने दोन दिवसांत १७ सापांना जीवदान दिले आहे. यातील १२ विषारी प्रजाती होत्या. साप आढळून आल्यास त्याला इजा न करता नजीकच्या सर्पमित्राला बोलावून सापाला जीवदान द्यावे.- नीलेश कंचनपुरे,अध्यक्ष, वॉर
एकाच दिवशी सात कोब्राचे ‘रेस्क्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:40 PM
पावसाळ्यात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांद्वारे नागरी वस्तीमध्ये सापांचा शिरकाव मोठ्या संख्येने होत आहे. वॉर या वन्यजीवप्रेमी संस्थेने रविवारी एकाच दिवशी तीन ठिकाणाहून कोब्रा या विषारी जातीचे सात साप पकडले. त्यांना जंगलास सोडून जीवदान देण्यात आले.
ठळक मुद्देनागरी वस्तीत सापांचा वावर वाढला : वॉरच्या सर्पमित्रांनी दिले जीवदान