कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनातर्फे लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, १५ दिवसांपासून कोरोना संक्रमणाची स्थिती आटोक्यात आल्याने व ऐन खरीप हंगामात लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून आजपासून अनलॉक करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध कामानिमित्त तहसील कार्यालयात मुद्रांक खरेदीसाठी गर्दी केली होती. मुद्रांक विक्रेत्यांनी त्याचा गैरफायदा घेत १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर ११० रुपयांना विक्री केल्याचे निदर्शनास आले. अनलॉकच्या पहिल्याच दिवशी अमरावती तहसील कार्यालयातून ००० खरेदी करण्यात आले. याची शासकीय किंमत ००० इतकी होत असताना ग्राहकांना यावर --- इतके रुपये आगाऊ मोजावे लागले.
बॉक्स
बाजारपेठेत ग्राहक झाले सैराट
अनलॉकच्या पहिल्याच दिवशी खरेदीकरिता ग्राहकांनी सैराट गर्दी केल्याचे दिसून आले. श्याम चौकातील सर्वच दुकांनामध्ये खरेदीकरिता रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरून वाहने सैराट धावताना दिसून आले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता वाहतूक पोलिसांनी चौकाचौकात नियुक्ती केल्याचे दिसून आले.
कोट
१०० रुपयांचे मुद्रांक शासकीय रेटनुसार १०० रुपयांतच विकण्याचे निर्देश वाईंडरांना दिलेले आहेत. त्यासाठी त्यांना कमिशनदेखील ठरविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगाऊ किमतीत विक्री होत असेल तर ते गैरकायदेशीर ठरेल. याची चौकशी करू.
- मनीष पलीकोंडवार,
प्रभारी सब रजिस्ट्रार, अमरावती तहसील
प्रतिक्रिया ग्राहकांच्या
मी १०० रुपयांचे पाच मुद्रांक खरेदी केले. वाईंडरला विचारणा केली असता, ११० रुपये प्रति मुद्रांक असे सांगण्यात आले. नाईलाजास्तव त्यांना ५५० रुपये द्यावेच लागले.
- अनिकेत प्र. खाडे,
उपसरपंच, शिराळा
-
वाईंडरला १०० रुपयांचे मुद्रांक मागितले असता ११० रुपये द्या, असे ते म्हणाले. उर्वरित काम लवकर व्हावे, यासाठी मी जास्तीचे १० रुपये नाईलाजास्तव वाईंडरला दिले.
- अनिकेत सु. बांबल, शेतकरी, शिराळा