सुनील चौरसिया।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका हद्दीत सद्यस्थितीत एक लाख पक्की घरे आणि ४० हजार झोपड्या आहेत. मात्र, जलसंवर्धनाच्या दृष्टीने केवळ दोन हजार कुटुंबांनीच पाऊल उचलल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून अल्प पावसामुळे नदी-नाले, तलाव कोरडे पडले होते. परिणामी गतवर्षी एप्रिल व मे महिन्यांत सर्वत्र भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यापुढे अशी स्थित उदभवू नये, नागरिकांवर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने महापालिकेच्यावतीने जलपुनर्भरणची संकल्पना राबविण्यात आली. यामध्ये महापालिका क्षेत्रातील शाळा, सार्वजनिक रुग्णालये, उद्यान, खुले मैदान, महापापालिका कार्यालय, शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या घरी, तसेच नवनिर्मित मंगल कार्यालयांसह घरांसह आदी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. याव्यतिरिक्त सामाजिक संघटनांनीदेखील रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविण्यास पुढाकार घेतला.महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत १५४३ रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आल्याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. खासगी तत्त्वावर नागरिकांनीसुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयत्न चालविला आहे. यात आणखी भर पडावी व पाण्याची पातळी वाढावी, या उद्देशाने महापालिका अधिकाऱ्यांद्वारा सामान्य नागरिकांनीदेखील आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेण्याचे आवाहन केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणारे घरमालकाला बांधकाम परवानगीच्या वेळी शुल्कात विशेष सूट देण्याचीदेखील महापालिकेने नियमावली लागू केल्याचा विषय सभागृहात ठरला.महापालिकेत आकडेवारी नाहीअमरावती महापालिका क्षेत्रांतर्गत सन २०१९ पूर्वी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आपापल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले. त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. जलसंवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी समजून नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन महापालिका अधिकाºयांनी केले आहे. अलीकडे भूगर्भातून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाऊ देता भूगर्भात मुरविण्याच्या उद्देशाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे झाले आहे.भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका हद्दीतील प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घ्यावेत. बांधकामावेळी एनओसी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंगची अट घातली आहे.- चेतन गावंडे, महापौर,अमरावती
शहरात घरे एक लाख, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केवळ दोन हजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:00 AM
जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून अल्प पावसामुळे नदी-नाले, तलाव कोरडे पडले होते. परिणामी गतवर्षी एप्रिल व मे महिन्यांत सर्वत्र भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यापुढे अशी स्थित उदभवू नये, नागरिकांवर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने महापालिकेच्यावतीने जलपुनर्भरणची संकल्पना राबविण्यात आली.
ठळक मुद्देअनास्था : बांधकाम परवाना देताना बंधन, अंमलबजावणी केव्हा?