महापालिकेचा कार्यकाळ ८ मार्च २०२२ पर्यत आहे. त्याचे सहा महिन्यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून प्रभाग रचना व त्यानंतर आरक्षणाची तयारी साधारणपणे सुरु होत असते. किंबहुना तसे आदेश राज्य निवडणूक विभागाकडून जारी होतात. त्यामुळे प्रशासनाला आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत महापालिकेत बहुसदस्यीय प्रणालीने २२ प्रभागात ८७ सदस्य निवडून आलेले आहे. यावेळी एक सदस्यीय प्रणालीने निवडणूक होत असल्याने महापालिकेत ८७ प्रभाग होणार आहे.
महापालिकेची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनूसार ही ६ लाख ५७ हजार ०४७ आहे व सन २०२१ जणगणना ही कोरोना संसर्गामुळे सध्या तरी प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेची लोकसंख्या जुनीच ग्राह्य धरुन प्रभाग रचना होण्याची शक्यता आहे. अलिकडच्या दोन सर्वसाधारण पाहता त्यावर निवडणुकांचे सावट असल्याचे दिसून आलेले आहे. सभेतील विषयांवर होणारी चर्चा, स्थगीत राहणारे विषय किंवा एखाद्या विषयावर सत्ताधारी किंवा विरोधक यांचा होणार विरोध पाहता पदाधिकाऱ्यांना आता निवडणुकांचे वेध लागल्याचे दिसून येते.
बॉक्स
७,५०० मतांचा राहणार एक प्रभाग
महापालिकेची लोकसंख्या ६,५७,०४७ आहे व त्यामध्ये ८७ प्रभागाचे विभाजन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा ७,५०० मतांच्या दरम्यान राहणार आहे. यामध्ये प्रभाग रचना करताना १० टक्के कमी किंवा अधिक असा नियम आहे. त्यानूसार प्रभाग रचना राहील. त्यानंतर त्या प्रभागाचे आरक्षण निश्चित होईल. त्यामुळे विकासकामे करतांना नगरसेवकांची धाकधुक वाढली आहे.
बॉक्स
असे आहे सध्याचे आरक्षण
महापालिकेत सद्यस्थितीत १५ सदस्य अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग २३ व सर्वसाधारण ४८ असी स्थिती आहे. यामध्ये ५० टक्के सदस्यपदे महिला राखीव आहेत. आता ओबीसीच्या राजकीय आरक्षनाच्या प्रश्नामुळे काही सदस्यपदे बाद की काय याबाबत निश्चिती झालेली नाही. त्यामुळे ओबीच्या २७ टक्के आरक्षणाबाबत चर्चा महापालिका वर्तुळात चर्चीली जात आहे.
कोट
सध्या एक सदस्यीय प्रभाग पद्धत राहणार आहे. तसे राजपत्र देखील आहे. अन्य पध्दतीबाबतचे निर्देश नाहीत. प्रभाग रचनेसाठी आयोगाचे निर्देशाची प्रतीक्षा आहे.
प्रशांत रोडे
आयुक्त, महापालिका