----------------------------------------
दस्तुरनगरात ‘ऑन दी स्पॉट’ चाचणी (फोटो)
अमरावती : दस्तुरनगर परिसरात अकारण घराबाहेर पडलेल्या २०४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. याशिवाय एका व्यक्तीने मास्क न घातल्याने त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यावेळी ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले यांच्यासह स्वास्थ्य निरीक्षक व वसुली लिपिक तसेच झोनचे कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------------------------
बडनेरा भागात १५१ चाचण्या (फोटो)
अमरावती : बडनेरा परिसरात १५१ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. सदर मोहिमेत सहायक आयुक्त विशाखा मोटघरे, भाग्यश्री बोरेकर व प्राची कचरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू ढिक्याव, स्वास्थ्य निरीक्षक विनोद टांक, मिथून उसरे, सोपान माहुलकर, इम्रान खान, कर लिपिक परिहार, राजेश चावरे, अजय चावरे, निकम, फुके, बीट प्यून नरेंद्र डुलगज, संदीप ढिक्याव, पंकज धवसेल आदी सहभागी होते.