शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

दर मिनिटाला एक पाॅझिटिव्ह, दोन तासांत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:08 AM

अमरावती : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाला. या ३० दिवसांत उच्चांकी १६,६९४ कोरोनाग्रस्तांची नोंद व दर १.४१ मिनिटाला ...

अमरावती : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाला. या ३० दिवसांत उच्चांकी १६,६९४ कोरोनाग्रस्तांची नोंद व दर १.४१ मिनिटाला एक पॉझिटिव्ह निष्पन्न झालेला आहे. याशिवाय या महिनाभरात ४१० रुग्णांचे उपचारादरम्यान मृत्यू म्हणजेच दर दोन तासांत एका बाधिताचा मृत्यू झाल्याने ही बाब जिल्ह्यावासीयांचे हृहयाचे ठोके वाढविणारी आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढायला सुरुवात झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२२० व ९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह व १६४ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर एप्रिल महिन्यात कहरच झाला. तब्बल १६,६९४ कोरोनाग्रस्त व ४१० बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला हादरा बसला आहे. या महिन्यात दरदिवशी सरासरी ५५७ कोरोनाग्रस्त व १४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय या महिन्यात १२,२१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. म्हणजेच दरदिवशी ४०७ व्यक्ती संकेमणमुक्त झाले, हा या चिंतेच्या काळातही दिलासा राहिला आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्यानंतर चार प्रकारांतील प्रत्येकी २५ असे एकूण नमुने जिनोम स्टडीकरिता पाठविण्यात आले होते. त्यात ७६ नमुन्यांमध्ये ‘डबल व्हेरिएंट म्युटंट’ आढळला होता. याची संसर्ग क्षमता अधिक असल्याने जिल्ह्यात ब्लास्ट झाल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. हे एक प्रकारचे मिनी लॉकडाऊन राज्यात पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात लागू झाले असतानाही कोरोनाचा संसर्ग वाढताच राहिला. आता तर पुन्हा महिनाभरासाठी संचारबंदी व जीवनावश्यक शिवाय सर्व दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही संसर्ग कमी होत नसल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

बॉक्स

नागपूरसह अन्य जिल्हे व एमपीतील रुग्ण जिल्ह्यात दाखल

जिल्हा सीमेलगतच्या नागपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात व मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड अपुरे पडत आहे. याशिवाय रेमेडेसिविरचा तुटवडा आहे. त्यामुळे गंभीर स्वरुपातील तिनशेवर रुग्ण, अमरावतीसह, अचलपूर, वरूड व तिवसा तेथील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचे नातेवाईकदेखील येथे दाखल झाल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचे मानण्यात येत आहे.

बॉक्स

जिल्ह्यात बेडसंख्येचा तुटवडा

अन्य जिल्हे व मध्यप्रदेशातील रुग्ण दाखल असल्याने जिल्ह्यातील सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरचा तुडवटा निर्माण झाला आहे. रुग्णाला घेऊन येणाऱ्या १०८ रुग्णवाहिका बेड रिक्त आहे का, याची चौकशी करीत शहरातील २९ रुग्णालयांत चकरा मारत असल्याचे विदारक चित्र आहे. संकेतस्थळावरील माहिती नियमित अपडेट केली जात नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांसमोर कुठे जावे, हा प्रश्न उभा ठाकला आहे.

बॉक्स

ॲक्टिव्ह ८,२३३ रुग्णांचा उच्चांक

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असल्याने सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या उच्चांकी ८,२३३ वरे पोहोचली आहे. यामध्ये १९१५ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात १,३४३ व जिल्हा ग्रामीणमध्ये ४,९७५ कोरोनाग्रस्त होम आयसोलेशनची सुविधा घेत आहेत. त्यामुळे तूर्तास आरोग्य यंत्रणेवरचा ताण काहीसा कमी झालेला आहे. मात्र, ग्रामीण भागात संसर्ग वाढता असल्याने या रुग्णांवर करडी नजर ठेवणे महत्त्वाचे आहे.

पाईंटर

महिना पॉझिटिव्ह मृत्यू

जानेवारी २,२१९ २२

फेब्रुवारी १३,२३० ९२

मार्च १३,५१८ १६४

एप्रिल १६,६९४ ४१०