अमरावती : हॉटेलमध्ये जेवण करताना बिलावरून हॉटेल मालकाशी काही जणांनी वाद घातला. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून शेजारच्या प्रतिष्ठानातील युवकाने मध्यस्थी केली. परंतु मध्यस्थी करणाऱ्या युुवकावरच तलवारीचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री ९.४५ वाजता गांधी चौक मार्गावरील जुना बस स्टँड परिसरात घडली. घटनेनंतर जनप्रक्षोभ उफाळून आल्याने तणाव निर्माण झाला होता. सोमवारीही या घटनेचे पडसाद या भागात जाणवत होते. पोलिसांनी या हत्याकांडातील पाच आरोपींना अटक केली आहे. चिंटू ऊर्फ सय्यद मुशिर आलम सय्यद नियाजअली (३५, रा. साबनपुरा) असे मृत युवकाचे नाव आहे. विस्तृत माहितीनुसार, गांधी चौक ते जवाहर मार्गावरील जुना मोटर स्टॅन्डजवळ विलास सावजी यांचे हॉटेल आहे. रविवारच्या रात्री या हॉटेलात आरोपी उमेश अशोक आठवले (३०, रा. माताखिडकी) व त्याचे चार साथिदार जेवण करण्याकरिता गेले होते. जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालक विलास सावजीसोबत उमेश आठवलेने वाद घातला. दरम्यान, उमेशने विलास सावजी यांना मारहाणही सुरू केली. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. सावजींच्या हॉटेलशेजारीच तनवीर आलम यांचे ‘पाप्युलर ट्रॅव्हल्स’ नामक प्रतिष्ठान आहे.पोलीस आयुक्तांनी सांभाळली धुरा ४सय्यद मुशिर आलम सय्यद नियाजअली यांचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी स्वत: मध्यरात्री घटनेचा आढावा घेतला. पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिलेत. पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात सहायक पोलीस आयुक्त रचना तिडके, पाटील यांच्यासह चार पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी इर्विन रुग्णालय, गांधी चौक, साबणपुरा, टांगा पडाव आदी भागात जाऊन पाहणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिलेत.
भांडण सोडविणाऱ्यालाच तलवारीने भोसकले
By admin | Published: November 03, 2015 1:50 AM