जिल्हा कचेरीच्या आवारात फेकले कांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 06:00 AM2020-09-19T06:00:00+5:302020-09-19T06:00:06+5:30
कें द्र सरकारने कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी संप्तत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कांदे फेकून शेतकऱ्यांवर अन्यायकारक हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कें द्र सरकारने कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी संप्तत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कांदे फेकून शेतकऱ्यांवर अन्यायकारक हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आधीच ५० टक्के कांदा सडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे अगोदरच अडचणीत सर्वसामान्य जनता सापडली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करून शेतकºयांना न्याय द्यावा, सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणाने सोयाबीन पिकांवर रोगाचा व अळीचा प्रादुर्भावामुळे नुकसानाचे पंचनामा करण्याचे तहसिलदारांना आदेश देऊन सोयाबीन, मुंग, उडदाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसने केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. आंदोलनात आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंग गैलवार, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, दयाराम काळे, गणेश आरेकर, नितीन गोंडाणे, नितीन दगडकर, प्रवीण घुईखेडकर, प्रमोद दाळू, सुधाकर भारसाकळे, अभिजित देवके, नीलेश घोडेराव, बबलू काळमेघ, श्रीकांत झोडपे, भागवत खांडे, बंटी मंगरोळे, दयाराम काळे, हरिभाऊ मोहोड, राहुल येवले, पंकज मोरे, बच्चू बोबडे, संजय लायदे, राजू कुरेशी, प्रदीप देशमुख आदी सहभागी होते.