बॉक्स
लहान मुलांमध्येही डोकेदुखी वाढली
१. मोबाईल किंवा कम्प्युटर सतत बघितल्याने डोळ्याच्या स्नायूमध्ये गॅप पडले.
२. डोळ्याची पूर्ण हालचाल होऊ शकत नाही. त्यामुळे डोळ्यातील पाणी कमी होते. कोरड्या डोळ्यांतून जिवाणू वाहून जाऊ शकत नसल्याने तसेच ओलावा नसल्याने डोळ्याच्या व्याधी वाढीस लागता. ३. डोकेधुकी व मानदुखीमुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यांच्या खानपानावर परिणाम होऊन व्याधी वाढते.
--
ऑनलाईन वर्गाचा अतिरिक्त वापर टाळा
मुलांच्या डोळ्यावर ऑनलाईन वर्गामुळे गंभीर परिणाम होत आहे. काही परिणाम दीर्घकालीन आहेत. आज ते तीव्र वाटत नसले तरी त्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे ऑनलाईन वर्गाचा अतिरिक्त ताण मुलांवर देणे धोक्याचे ठरू शकतात.
- डॉ. नम्रता सोनोने, जिल्हा सामान्य रुग्णालय
--
माझा मुलगा इयत्ता तिसरीत शिकतो. त्याचे रोज ऑनलाईन क्लासेस होत आहे. ४५ मिनिटांनंतर दोन मिनिट विश्रांती राहते. यात कनेक्टिव्हिटीची अडचण वारंवार येत राहते.
- शंकर चव्हाण, पालक
मुलगा दोन वर्षांपासून ऑनलाईन वर्गातच अध्ययन मोबाईलवर ऑनलाईन करीत आहे. आपसुकच मुलाचा मोबाईल वापर वाढल्याने त्याला डोळ्याचे आजार होण्याची भीती वाटू लागली आहे. यावर लवकर तोडगा निघणे अपेक्षित आहे.
- उदय जोशी, पालक
लहान मुलांना हे धोके
अतिवापरामुळे मुलांना डोकेदुखीचा त्रास होत आहे.
सलग काही तास नजर स्थिर राहत असल्याने डोळ्याचे स्नायू दुखतात.
वाकून बघत असल्याने मानेवरही ताण पडतो. पाठदुखी जाणवते.ऑनलाईन असताना मुले सलग काही तास एकाच जागेवर राहतात. पोटदुखी होऊ शकते.
--
डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून हे करा
संगणक स्क्रिनवर अँटी ग्लेयर ग्लास बसवावी. अँटी ग्लेयर चष्मा वापरा
पुस्तक-संगणक उजेडात ठेवा
प्रत्येक तासिकेनंतर डोळे बंद ठेवून थोडा आराम करा
जास्तीत जास्त फलाहार सेवन करा
पुस्तक १२ ते १५ इंच अंतरावर धरा.