अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२० ऑनलाईन परीक्षेला २० मेपासून प्रारंभ होत आहे. यात २८ अभ्यासक्रम आणि २८ विषयांच्या परीक्षांचा समावेश असणार आहे. संचारबंदीत ऑनलाईन परीक्षांना मुभा दिल्याने या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १६ ते २२ मे यादरम्यान संचारबंदीचे नवे आदेश जारी केले आहेत. या आदेशात ऑनलाईन परीक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे. परीक्षांशी निगडित अधिकारी, कर्मचारी यांना संचारबंदीच्या काळात सेवा बजावण्यासाठी विद्यापीठाला या नव्या आदेशानुसार कर्तव्यासाठी बोलावता येणार आहे. परीक्षानंतर स्वयंचलित गुणदान देण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी १० ते ११ या वेळेत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.
-----------------------
गुरूवारी या परीक्षांचे नियोजन
इंजिअनिअरिंग मॅथेमॅटीक्स - १, एससीटी- इंजिअनिअरिंग मॅथेमॅटिक्स-१, बिल्डिंग मटेरिअल ॲन्ड कन्स्ट्रक्शन्स-१, कन्स्ट्रक्शन्स प्रोजेक्ट प्लॅनिंग ॲन्ड मॅनेजमेंट, इन्ट्रोडक्शन्स टू अर्थक्वेक ॲन्ड रेट्रोफिटिंग ऑफ स्ट्रॅक्चर्स, ट्रॉफिक इंजिनिअरिंग ॲन्ड फिल्ड स्टडिज, ॲडव्हान्स कॉम्प्युटर आर्किटेक्चर, डिजिटल इन्स्ट्र्युमेंटेशन, डिजिटल कंट्रोल सिस्टीम, ॲडव्हान्स कंट्रोल सिस्टीम, ॲडव्हान्स ऑप्टिकल कम्युनिकेशन, ऑपरेटिंग सिस्टीम कॉफ्निग्युरेशन, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, कम्प्युटर अँड डिझाईन, ॲडव्हान्स मॅथेमॅटिक्स, एन्व्हायर्न्मेंटल मायक्राेबॉयोलॉजी आदी विषयांचा समावेश आहे.