अमरावती : मोठा गाजावाजा आणि पारदर्शकतेचा दावा करुन सुरू केलेल्या आॅनलाईन गॅस बुकिंग सेवेने ग्राहकांच्या डोक्याचा ताप वाढविला आहे. गॅस बुक झाला की नाही, याबाबत ‘एसएमएस’ येणे बंद झाल्याने संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी सिलिंडरधारकांनी केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात वळते होण्याची ‘डीबीएलटी’ योजना सुरू झाल्यानंतर गॅस कंपन्यांनी बुकिंगसाठी विशिष्ट मोबाईल क्रमांक दिला होता. रजिस्टर्ड मोबाईलवरुन विशिष्ट क्रमांक डायल केल्यास सिलिंडरचे बुकिंग होत होते. आताही हीच प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आता फोन लावल्यानंतर सुरूवातीला ‘सबसिडी’ सोडण्यासंदर्भातील आवाहन आणि भाषणबाजीला ग्राहक वैतागले आहेत. बुकिंग करताना पूर्वी क्रमांक १ चे बटन दाबल्यावर ‘गॅस रिफिल बुकिंग’ होत असे. पण, आता गॅस कंपन्यांनी इतर क्रमांक समाविष्ट केल्याने ग्राहकांना अडचणी येत आहेत. ५ क्रमांक दाबल्यास अनेकांची ग्राहकांची सबसिडी कायमची ‘विड्रॉल’ होत आहे.
आॅनलाईन गॅस बुकिंग डोक्याला ताप!
By admin | Published: March 10, 2016 12:25 AM