-----------------------------
महाशिवरात्रीनिमित्त वृक्षारोपण, पाणपोईचा शुभारंभ
नांदगाव पेठ : लगतच्या माहुली जहांगीर येथे विदर्भ पीठाधीश्वर श्रीराजेश्वर माऊलीद्वारा स्थापित महाकाली धाम मंदिराच्यावतीने महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर वृक्षारोपण व पाणपोईचा शुभारंभ करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अजय नागोने, सरपंच प्रीती बुंदिले, ग्रामपंचायत सदस्य गजानन लायबर, प्रतीक सावळे, स्वाती नाकाडे, वसंत पाचघरे, व्यवस्थापक बनसोड सह मान्यवर उपस्थित होते.
-------------------
‘सतर्क जग आव्हानात्मक जग’वर राष्ट्रीय वेबिनार
अमरावती : कोविड-१९ च्या कालखंडात अनेक आशावर्कर्स, महिला परिचारिका, महिला वैद्यकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांनी हे सिद्ध करून दिले की, समान पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. प्रत्येक महिला ही एक विद्यापीठच असते, असे प्रतिपादन कर्नाटक महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू मीना चंदावरकर यांनी केले. त्या महिला दिनानिमित्त आयोजित ‘सतर्क जग आव्हानात्मक जग’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये बोलत होत्या.
--------------
महिला महाविद्यालयात ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
चांदूररेल्वे : महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदूर रेल्वे येथील गृहअर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थिनींकरिता वर्तमान स्थितीत 'राष्ट्रविकासात महिलांचे योगदान' या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य सीमा जगताप, तर प्रमुख पाहुणे विजय कापसे, गजानन वेले, प्रदीप दंदे, मीना देशमुख, संजीव भुयार उपस्थित होते.
------------------------
दस्तुरनगरात महापालिकेकडून दंडवसुली
अमरावती : दस्तूरनगर अंतर्गत येणाऱ्या वुमन हेल्थ क्लब यांना सोशल डिस्टनसिंगबाबत ८ हजार रुपये व सदर ठिकाणी चार लोकांना मास्क न वापरल्याने २ हजार रुपये दंड आकरण्यात आला. सदर ठिकाणी ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक हडाले व स्वास्थ्य निरीक्षक शैलेश डोंगरे, बिटप्यून विकास पचेल, संजय घारू हजर होते.
------------
विद्यापीठात स्वास्थ्य संवर्धनावर कार्यक्रम
अमरावती : योग साधनेतील व्यायाम, आहार व स्वाध्याय ही निरामय स्वास्थ्य संवर्धनाची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पी.आर. राजपूत यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने पदव्युत्तर पदविका योग थेरपी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरिता विभागाचे संचालक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात स्वास्थ्य संवर्धनावर आभासी पद्धतीने नुकताच कार्यक्रम पार पडले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
-----------------
पान ३ साठी सारांश