मुंधडा महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे आयोजन
चांदूर रेल्वे -
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चांदूर रेल्वे शहरातील स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयाच्या क्रीडा, शारीरिक व शिक्षण विभागाच्यावतीने ऑनलाईन राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारमध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, गुजरात, हरियाणा व महाराष्ट्रातील एकूण १५० जणांनी सहभाग घेतला होता. या वेबिनारचे संचालन मुंधडा महाविद्यालयाच्या क्रीडा विभागप्रमुख अलका करणवाल यांनी केले. प्राचार्य जयंत कारमोरे यांनी अध्यक्षीय भाषणात योगाच्या माध्यमातून रोगमुक्त जीवन याबाबत विचार मांडले. बरकतउल्लाह विद्यापीठाच्या साधना धानोरिया व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे विभागप्रमुख सुनील लंबडे प्रमुख वक्ते होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुधीर शेंडे, अधीक्षक अजय कैकाडे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.