शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
2
"अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
3
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; बौद्ध प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
4
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
5
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
6
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
7
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
8
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
9
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
10
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
11
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
12
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
13
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
14
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
15
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
16
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
17
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
18
पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा
19
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
20
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

रेल्वेचे जनरल तिकिट मिळणार आॅनलाईन

By admin | Published: November 17, 2016 12:19 AM

रेल्वे प्रशासनाने जनरल तिकिट आॅनलाईन देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आता प्रवाशांना जनरल तिकिट मिळविण्यासाठी रांगेत उभे राहण्याची भानगड संपुष्टात आली आहे.

प्रवाशांना दिलासा : रांगेत उभे राहण्याची भानगड संपलीअमरावती : रेल्वे प्रशासनाने जनरल तिकिट आॅनलाईन देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आता प्रवाशांना जनरल तिकिट मिळविण्यासाठी रांगेत उभे राहण्याची भानगड संपुष्टात आली आहे. हा निर्णय रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा आहे.रेल्वे गाड्यात आरक्षण मिळविणे कठीण झाले आहे. अशातच जनरल तिकिट मिळविण्यासाठी रांगेत उभे राहण्याची कटकट ही नित्याचीच बाब झाली असताना आता जनरल तिकिट हे आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. यापूर्वी रेल्वे गाड्यांचे जनरल तिकिट हे रेल्वेच्या खासगी केंद्रावर मिळायचे. परंतु आता खासगी ई- वॉलेटवर उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांना एका क्लिकवर जनरल तिकिट मिळेल. परिणामी रेल्वे स्थानकावर तिकिटांसाठी पुर्वापार दिसणाऱ्या लांबलचक रांगा दिसेनासा होतील. दरदिवसाला रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. अशातच जनरल तिकिट मिळविण्यासाठी लांबलचक रांगामुळे बऱ्याचदा प्रवाशांना गाड्या सुटण्याचा प्रसंग ओढवला आहे. जनरल तिकिट मिळविण्यासाठी रांगामध्ये बाचाबाची, वाद होण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र जनरल तिकिट आॅनलाईन मिळत असल्यामुळे सामान्य प्रवाशांची डोकेदुखी दूर होणार आहे. जनरल तिकिट आॅनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रेल्वेच्या खासगी तिकिट केंद्रावर परिणाम जाणवेल, यात दुमत नाही. काही मोबाईल कंपन्या, पेटीएमसारख्या खासगी ई- वालेटचा वापर करुन जनरल तिकिट आॅनलाईन काढता येणार आहे. आॅनलाईन जनरल तिकिट ही सुविधा प्रायोगिक तत्वावर काही रेल्वे स्थानकांवर सुरु होणार आहे. याबाबत रेल्वेचे आदेश प्राप्त होताच ही सुविधा लागू होईल.- व्हि. डी. कुंभारेवाणिज्य निरिक्षक, बडनेरा