लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या 'फिफा अंडर १७' वर्षीय आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्र मिशन अंतर्गत १ मिलियन शाळांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक शाळांना तीन फुटबॉल वाटप करण्याचे शासनाचे धोरण असून विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी बुधवारी ६ सप्टेंबरपर्यंत करावी लागेल. फुटबॉल खेळासाठी शाळांमध्ये चमुंची निवड करून मुख्याध्यापकांनी नावे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे पाठवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या १ सप्टेंबर २०१७ रोजी शासन आदेशानुसार फुटबॉल मिशन १ मिलीयन हा कार्यक्रम शाळांमध्ये दमदारपणे राबवायचा आहे. त्याकरिता एका शाळेला तीन फुटबॉल वाटप केले जाणार आहे. मात्र ज्या शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला नाही किंवा विद्यार्थ्यांची नावे पाठविली नाहीत, अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना आता विद्यार्थ्यांची नावे आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्याकरिता शाळांना मेल आयडी क्रमांक कळविण्यात आले आहे. शाळांची फुटबॉल संघाची निवड करून त्या संघातील विद्यार्थ्यांची नावे आॅनलाईन नोंदणी करून पाठवावी लागेल. विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, वर्ग, वय, आधार क्रमांक आदी नमुन्यात ६ सप्टेंबरपर्यंत 'अपलोड' करावी लागेल. विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी झाल्यानंतर शाळांच्या मुख्याध्यापकांना ९ सप्टेंबर रोजी येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात फुटबॉलचे वाटप केले जाईल, अशी माहिती पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. लॉगीइन झालेल्या विद्यार्थ्यांची नावे या बैठकीला येताना मुख्याध्यापकांना सोबत आणणे अनिवार्य राहील. बैठकीनंतर मुख्याध्यापकांना फुटबॉलचे वितरण होईल. देशात एकाच दिवशी (१५ सप्टेंबर) फुटबॉल खेळले जाणार आहे. त्यानुसार फुटबॉल वाटप झालेल्या शाळांना त्यांच्या प्रांगणात फुटबॉल खेळाचे आयोजन करावे लागणार आहे.सेल्फी पॉर्इंट, विविध स्पर्धांचे आयोजनशाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळात सहभाग घेतला असेल ते वगळता अन्य विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धा आणि शुभेच्छा संदेश हा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच शाळांमध्ये सेल्फी पॉर्इंट उभारून त्यांचे फोटो २० सप्टेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शुभेच्छा संदेश भारतीय संघापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.शासनादेशाचे पालन करावे लागेल. शाळांना अल्पावधीत ६ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांची नावे आॅनलॉईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच १५ सप्टेंबर रोजी फुटबॉल खेळाचे आयोजन करून शाळांना 'फिफा' आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा प्रचार व प्रसार करावा लागेल.- गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती
महाराष्ट्र फुटबॉल मिशनसाठी विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 10:52 PM
येत्या आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या 'फिफा अंडर १७' वर्षीय आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्र मिशन अंतर्गत.....
ठळक मुद्देशाळांना चमू निवडीच्या सूचना: मुख्याध्यापकांना बुधवारपर्यंत 'डेडलाईन'