लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. गुरूवारपर्यत दोन लाख पाच हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे तर एक लाख ९० हजार शेतकºयांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात ‘आपले सरकार’ या पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढला असल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे.योजनेची १५ सप्टेंबर डेडलाईन आहे. मात्र, या अवधीत सर्व पात्र शेतकºयांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इंटरनेटची समस्या असल्याने या योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतकºयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यत किंवा नंतर झालेल्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यत वसूल न झालेले थकीत व उर्वरीत हप्ते यांचा समावेश आहे. सुरूवातपासूनच या योजनेचे सर्र्व्हर डाऊन, नेट कनेक्टीव्हीटी नाही, बायोमॅट्रीक डिव्हायस कनेक्ट न होणे, शेतकºयांना केंद्रचालकांचे असहकार्य, आॅनलाईन अर्जासाठी शेतकºयांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने घेतल्याने आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.पुनर्गठनच्या कर्जास मिळणार लाभकर्जदार शेतकºयांचे ३१ जुलै रोजी पुनर्गठीत कर्जाचे थकीत हप्ते पुढील काळातील येणे हप्ते, चालू अल्प किंवा मध्यम मुदत कर्ज मिळून एकूण कमाल रक्कम दीड लाख इतक्या मर्यादेपर्यत च्या रकमेला संपूर्ण कर्जमाफी मिळण्यास पात्र आहेत. ही रक्कम दीड लाखांपेक्षा जास्त होत असल्यास संबंधित कर्जदार शेतकºयाने त्याच्या हिश्याची दीड लाखांवरील थकीत कर्जाची व्याजासह रक्कम दीड लाखाच्या मर्यादेत भरणा केल्यास दीड लाखापर्यतची कर्जमाफीची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार आहे.सहकार विभागाच्या पथकांनी अनेक केंद्रांना भेटी दिल्यात. शेतकºयांना उद्भवणाºया समस्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. येणाºया अडचणी शासनाकडे मांडल्या. आता सर्व्हरचा वेग वाढला असल्याने अधिकाधिक अर्ज भरल्या जात आहेत-गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक
दोन लाख शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 11:03 PM
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रिया : आठ दिवसात संपणार योजनेची मुदत