आठ ते दहा दिवसांत प्राप्त होणार विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके
अमरावती : जिल्ह्यामध्ये नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात २८ जूनपासून झाली आहे. कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने शाळांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे निर्देश आहेत. मात्र, बालभारतीकडून अद्याप नवीन पुस्तके न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय ऑनलाईन हजेरी लावावी लागत आहे. गत वर्षाची दहा ते वीस टक्के पुस्तके परत आली आहेत. त्यामुळे अभ्यास करायचा तरी कसा, असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वशिक्षा अभियानातून दरवर्षी मोफत पाठपुस्तके देण्यात येतात. मात्र, कोरोना संसर्गामुळे यंदा पुस्तकांची छपाई बालभारतीकडून थांबली होती. त्यामुळे पुढच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तके शाळांमध्ये जमा करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून दिले होते. मात्र, याकडे बहुतांश पालकांसह विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने १० ते २० टक्केच विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत करण्यात आली. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांच्या छपाईचे काम उशिराने सुरू झाले आहे. परिणामी नवीन पुस्तकांची विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. यावर पुस्तके उपलब्ध न झाल्याने हिरमोड झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन शाळेत पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना हजेरी लावावी लागत आहे.
बॉक्स
पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार ?
कोट
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण मिळत आहे.अद्याप नवीन पुस्तके मिळालेले नाहीत. पुढच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जी पुस्तके जमा केली, ती पुस्तके शाळेकडून द्यायची कुणाला, हाही प्रश्न निर्माण झाला आहे. पुस्तके कमी अन् मागणी अधिक हेदेखील पुस्तके उपलब्ध न होण्यामागील कारण आहे.
- आनंद टेकाडे, पालक
कोट
नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी अजूनपर्यत मुलाला पुस्तके मिळालेली नाहीत.शाळा मात्र ऑनलाईन सुरू आहेत.मग शिक्षण शिकवितात यावर अभ्यास करण्यासाठी पुस्तके नसल्याने अशा शिक्षणाचा काही फायदा मुलांना होत नाही.
- प्रदीप माकोडे,
पालक
कोट
बालभारतीकडून काही प्रमाणात नुकताच पाठपुस्तकांचा पुरवठा झाला आहे. ती पाठपुस्तके अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्याला देण्यात आली आहेत. लवकरच उर्वरित तालुक्यालाही पाठपुस्तके नियोजनानुसार उपलब्ध होताच मुलांना वितरित केले जातील.
- एजाज खान,
शिक्षणाधिकारी प्राथमिक
बॉक्स
लवकरच मिळणार पुस्तके
काही विद्यार्थ्यांनी पुस्तके परत केली आहेत. ती नवीन विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन केले आहे.
समग्र शिक्षा अभियान विभागाकडून नियोजनानुसार विद्यार्थ्यांकरिता आवश्यक पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली आहे.
आठ ते दहा दिवसात जिल्हा स्तरावर पहिली ते आठवीची नवीन पुस्तके प्राप्त होणार आहेत. यामध्ये पहिला टप्पा उपलब्ध झाल्याने दोन तालुक्यात वितरण केले आहे. इतर तालुक्यांना पुस्तकांचा पुरवठा होणार आहे. शाळांनी व्हाॅट्सॲपवर पाठविलेलाच अभ्यास विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे लवकरच पुस्तके मिळतील यासाठी प्रयन्न सुरू आहे.
बॉक्स
वर्गनिहाय लाभार्थी विद्यार्थीसंख्या
पहिली-२८३४३
दुसरी-२५०९५
तिसरी-२६९५७
चौवथी-३०९७३
पाचवी-३५८२३
सहावी -३५८०६
सातवी-३७७६४
आठवी-३७४२४