शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
5
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
6
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
9
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
10
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
11
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
12
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
13
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
14
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
15
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
16
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
17
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
18
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
19
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
20
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

महिलेचा ऑनलाइन पाठलाग; फेसबुकवर प्रपोझ करून पाठवली किसिंग इमोजी अन्...

By प्रदीप भाकरे | Published: July 21, 2024 5:13 PM

आरोपी तिलक ठाकूर याने फिर्यादी महिलेस १९ जुलै रोजीच्या पहाटे ३:४१ पासून रात्री १२ पर्यंत अनेक मेसेज पाठविले...

अमरावती : फेसबुक अकाउंटवरून प्रपोझ अन् किसिंग इमोजी पाठवत एका महिलेचा ऑनलाइन पाठलाग करण्यात आला. तिने भाव न दिल्याने खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकीदेखील त्याने दिली. १९ जुलै रोजी पहाटे चार ते २० जुलै रोजीच्या सकाळी ७:१२ पर्यंत ती ऑनलाइन पाठलागाची घटना घडली. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी २० जुलै रोजी रात्री आरोपी तिलक ठाकूर (रा. अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, १९ जुलै रोजी पहाटे यातील फिर्यादी ही झोपेतून उठली. काही वेळाने तिने मोबाइल पाहिला असता तिला तिचा मित्र तिलक ठाकूर याच्या फेसबुक अकाउंटवरून तिच्या फेसबुक अकाउंटवर ‘आय लव्ह यू’ तसेच किस इमोजी दिसून आले. आय लाइक यू, मै तुमसे प्यार करता हू, असादेखील मेसेज दिसून आला. तो एवढ्यावरच न थांबता त्याने व्हाइस कॉलवर तिला उद्देशून गाणेदेखील म्हटले. आरोपी तिलक ठाकूर याने फिर्यादी महिलेस १९ जुलै रोजीच्या पहाटे ३:४१ पासून रात्री १२ पर्यंत अनेक मेसेज पाठविले.

मला सहकार्य कर२० जुलै रोजी सकाळी ७:१२ च्या सुमारासदेखील आरोपीने ‘गुड मॉर्निंग’ असा मेसेज पाठविला. मी तुमच्या रिप्लायची वाट पाहतो, असे म्हणून महिलेचा छुपा पाठलाग करून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. मला सहकार्य कर, अशी धमकीदेखील त्याने दिल्याने पीडिता नखशिखांत हादरली. त्यामुळे तिने सायंकाळच्या सुमारास राजापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFacebookफेसबुक