लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ज्ञांच्या मदतीने आरोग्य सल्ला व उपचाराची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. तपासणीची कार्यवाही अधिक काटेकोर व व्यापक करण्यात येत आहे. आवश्यक तेथे पुन:तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दिले.केंद्राच्या सूचनेनुसार, राज्य शासनाकडून आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून, सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ, तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल, अशी त्रिस्तरीय वर्गवारी शासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांमध्ये एकही संशयित सुटता कामा नये, तसेच आवश्यक तिथे पुन:तपासणीची कार्यवाही होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, ४ हजार ४४६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांत चाचणी वाढविण्यात आल्या आहेत. थ्रोट स्वॅब तपासणीसाठी ३८८ नमुने घेण्यात आले. त्यापैकी २६४ नमुने निगेटिव्ह आहेत. ९९ अहवाल प्रलंबित आहेत. २० अहवाल रिजेक्टेड असले तरी त्यातील १३ नमुने पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. सर्व तपासण्या काटेकोर व्हाव्यात. कुठेही शंकेला वाव राहता कामा नये व सर्वांची सुरक्षितता जपली जावी, यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे व आवश्यक तिथे पुन:तपासणी करण्यात येत आहे. बाधित क्षेत्रासाठी तात्काळ तपासणी, अलगीकरण, विलगीकरण धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.रेशन वितरणात सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचेलॉकडाऊनचा कालावधी वाढ झाल्याने अन्नधान्य वितरणासाठी नियोजनपूर्वक व प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना गहू ८ रुपये प्रतीकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतीकिलो या दराने प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पुरवठा यंत्रणेला दिले आहेत. धान्यवाटप करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 5:00 AM
केंद्राच्या सूचनेनुसार, राज्य शासनाकडून आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून, सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ, तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल, अशी त्रिस्तरीय वर्गवारी शासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांमध्ये एकही संशयित सुटता कामा नये, तसेच आवश्यक तिथे पुन:तपासणीची कार्यवाही होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ठळक मुद्देपालकमंत्री : शासन निर्देशानुसार कोरोना हॉस्पिटलची त्रिस्तरीय वर्गवारी