अमरावती : स्मार्ट सिटीसाठी राज्यातील १० शहरांची निवड खुल्या स्पर्धेत झाली. यामध्ये अमरावती आहे व या स्मार्ट १० शहरांमध्ये केवळ अमरावती येथे २५० ते ३०० एकर जागा उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी विकास नाही तेथे विकास करता येईल किंवा जुन्या गावठाणाचे पुनर्गठन करून विकास करता येईल, असे अमरावती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले. स्मार्ट सिटीसंदर्भातील प्लॅन ३१ डिसेंबरच्या आत शासनाला सादर करावयाचा आहे. स्मार्ट सिटीसंदर्भात चार क्षेत्राची निवड करण्यात आली. कुठल्या क्षेत्रात स्मार्ट सिटी करायची यासंदर्भात नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. गुरूवारी एक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला अमरावतीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कृषी उद्योगावर आधारित विकास हा महत्त्वाचा उद्देश आहे. भविष्यातील अमरावती शहर साकारताना २४ तास पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वीज, स्मार्ट वाहतूक व्यवस्था, ई-सर्व्हिस, ग्रीन एनर्जी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, कचरामुक्त शहर, घनकचरा व्यवस्थापन, भुयार गटार योजना, मलशुद्धीकरण केंद्र, सोलर एनर्जीवर यंत्रणा, मोबाईल अॅप्लिकेशन आदी सुविधा होणार असल्याचे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले.
स्मार्ट १० शहरांपैकी फक्त अमरावतीत जागा उपलब्ध
By admin | Published: November 07, 2015 12:11 AM