शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

रॅगिंग घेणाºया मुलींनाच बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:05 AM

मानसिक धक्का विसरणे आयुष्यभर कठीण व्हावे, अशी अश्लिल आणि मानवाधिकारांचे हनन करणारी रॅगिंग ज्यांना सहन करावी लागली, .....

ठळक मुद्देअजब संस्था, गजब कारभार : ४३ विद्यार्थीनींच्या तक्रारीला नसे मोल

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानसिक धक्का विसरणे आयुष्यभर कठीण व्हावे, अशी अश्लिल आणि मानवाधिकारांचे हनन करणारी रॅगिंग ज्यांना सहन करावी लागली, त्या ४३ विद्यार्थीनींना न्याय देण्याऐवजी रॅगिंग घेणाºया सहा मुलींचा बचाव करण्यासाठी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संचालक आणि 'अ‍ॅन्टि रॅगिंग कमिटी' प्रयत्नरत आहे.''दि. २७.८.१७ रोजी रात्री १२ च्या सुमारास कला शाखेच्या सिनिअर्सकडून विज्ञान शाखेतील ज्युनिअर्सची कपडे काढून रॅगिंग करण्यात आली...'', असे वाक्य स्पष्टपणे नमूद केलेली तक्रार ४३ मुलींच्या सह्यांनिशी संचालकांच्या नावे देण्यात आल्यावरही प्रकार घडल्याचे मान्य करून ''पा्रथमिक चौकशीनुसार सदर घटना रॅगिंग प्रकारात मोडत नाही. हा प्रकार वसतीगृहातील असुविधेमुळे झाल्याचे दिसून येते,'' असे निरीक्षण शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर यांनी नोंदविले. अन्यायग्रस्त मुली आणि पालकांमध्ये त्यामुळे संताप उफाळून आला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला प्राध्यापकांची स्वतंत्र समिती गठित करण्यात आली. या समितीमार्फत चौकशी सुरू आहे. अंतिम अहवाल आल्यावर दोषींवर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही अर्चना नेरकर यांनी स्पष्ट केले आहे.चौकशीला आश्चर्यकारक विलंबनेरकर यांच्यानुसार, त्यांना २८ आॅगस्ट रोजी तक्रार प्राप्त झाली. तीत अश्लिलता आणि कपडे काढण्यास बाध्य करण्याच्या रॅगिंगचा उल्लेख असतानादेखील 'टॉप प्रियॉरिटी' अर्थात अतितात्काळ-अतिमहत्त्वाचे या श्रेणीचा दर्जा देऊन प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी प्राध्यापकांच्या सुट्यांचाच विचार अधिक करण्यात आला. २७ च्या रॅगिंगचा अहवाल 'अ‍ॅन्टि रॅगिंग कमिटी'कडून ३१ च्या सायंकाळी अर्थात चौथ्या दिवशी सायंकाळी संचालकांना प्राप्त झाला. रॅगिंग घेणाºया मुलींना 'क्लिन चिट' देणारा हा अहवाल प्राथमिक चौकशीचा आहे. त्यानंतरचा चौकशी अहवाल ४ तारखेला प्राप्त होईल, असे संचालकांनी स्पष्ट केले. पहिल्या चौकशीदरम्यान ३० तारखेची गौरीपुजनाची आणि पुढे २ व ३ तारखेची ईद व रविवारची सुटी असल्यामुळे अहवालाला उशिर लागणाच, असा संचालकांचा युक्तिवाद आहे. मुलींवर गुदरलेल्या रॅगिंगची चौकशी त्वरेने करण्याऐवजी सुट्यांमध्ये अडसर नको, अशीच मानसिकता संचालक आणि चौकशी समितीची दिसून आली.प्रकार घडल्याचे मान्य, तरीही फौजदारी तक्रार नाहीशासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत घडलेला मुलींच्या छळाचा प्रकार संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर, अ‍ॅन्टि रॅगिंग कमिटीचे प्रमुख विवेक राऊत आणि त्यांच्या चमूला मान्य असला तरी ती रॅगिंग नव्हती, असे चित्र उभे करण्यासाठी संस्थेची धडपड सुरू आहे. 'त्या' सहा मुलींविरुद्ध फौजदारी तक्रार त्यामुळेच नोंदविण्यात आली नाही. बंधनकारक असले तरी रॅगिंगचे वृत्त 'लोकमत'ध्ये प्रकाशित होईपर्यंत शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत रॅगिंग प्रतिबंधक समितीची माहितीच जाहीर करण्यात आलेली नव्हती. रॅगिंग प्रतिबंधक समिती अस्तित्वात आहे काय? तिचे प्रमुख कोण? इतर सदस्य कोण? त्यांची पदे काय? त्यांचे संपर्क क्रमांक काय? यासंबंधिची माहिती ठळक अक्षरांत दर्शनी भागात विद्यार्थ्यांना सहज कळेल, अशा रीतीने जाहीर करणे आवश्यक आहे.त्या क्रिमिनल नाही!तक्रारीनुसार प्रकार घडलेला आहे. केलेला प्रकार चुकीचाच आहे. परंतु त्यादेखील महाविद्यालयाच्याच विद्यार्थीनी आहेत, असा सूर वरिष्ठ महिला प्राध्यापकांच्या स्वतंत्र समितीतील सदस्यांनी आवळला. त्यामुळे ही समिती निष्पक्षपणे काम कसे करेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे.रॅगिंग घेणाºयाच आजारी?रॅगिंग घेणाºया पाच मुलींपैकी दोन मुली रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्या होत्या अशी माहिती, संचालक नेरकर यांनी दिली. केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्यामुळे त्यांना उपचारांची गरज पडली, असे संचालकांचे मत होते. तथापि होणाºया कारवाईतून वाचण्यासाठी स्वत:विषयी सिम्पथी निर्माण करवून घेण्याकरिता तर सदर प्रकार करण्यात आला नव्हता ना, याविषयी कुठलीही शहनिशा संस्थेने केली नाही.

'लोकमत'वर अभिनंदनाचा वर्षावरॅगिंगचे प्रकरण 'लोकमत'ने उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. या गंभीर प्रकरणाबाबत अवघ्या महाराष्ट्रात विचारमंथन सुरू झाले. पोलीस प्रशासन, महाविद्यालय संस्थेचे प्रशासन खडबडून जागे झाले. शहरात आज 'लोकमत'चा अंक बघता-बघता संपल्यामुळे उत्सुक वाचक अंक मिळविण्यासाठी धावाधाव करताना दिसले. भारतीय जनता युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर यांना भेटून कारवाईची मागणी केली. दोन दिवसांत दोषी मुलींविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी, असा इशारा देण्यात आला. गाडगेनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख कैलास पुंडकर यांनीही संचालकांची भेट घेतली. आतापर्यंत अस्तित्वशून्य असलेली 'अ‍ॅन्टि रॅगिंग कमिटी' 'लोकमत'च्या बातमीनंतर कार्यान्वित झाली. मुलींना न्याय मिळवून देण्यात 'लोकमत'ने अभिनंदनीय कार्य केल्याच्या ढिगभर प्रतिक्रिया आल्या.'त्या' सहा मुलींचे दुसºया वसतिगृहात स्थानांतरणअमरावती रॅगिंग घेतल्याची तक्रार ज्या सहा मुलींविरुद्ध करण्यात आली आहे, त्या सहा मुलींविरुद्ध स्थानांतरणाची कारवाई करण्याचे आदेश शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संचालकांनी शुक्रवारी दिले. 'त्या' सहाही मुलींना नवीन वसतीगृहातून जुन्या वसतीगृहात हलविण्यात यावे, असा तो आदेश आहे. 'त्या' सहा सिनिअर मुलींनी इतर ज्युनिअर मुलींशी तक्रारीप्रमाणे कृत्य केल्याचे संचालकांना मान्य असल्यामुळेच, हा आदेश पारीत करण्यात आला. तत्काळ प्रभावाने त्या मुलींचे वसतीगृह बदलविण्यात आले.आपसात निपटत असेल तर पहा !संचालक अर्चना नेरकर यांनी दोन्ही पक्षांच्या मुलींना रात्री 'आपसात निपटत असेल तर पहा, उद्या सकाळपर्यंत वेळ आहे, अथवा कारवाई करावी लागेल' असे धमकावले. नेमकी कुणावर कारवाई करावी लागेल हे त्यांनी स्पष्ट न केल्यामुळे तक्रारकर्त्या मुली आपल्यावर कारवाई होणार काय, या भितीत आहेत.सर्वांचेच बयाण नोंदविलेज्या मुलींवर प्रसंग गुदरला त्यांचे स्वतंत्र बयाण प्राध्यापक अंजली देशमुख यांच्या नेतृत्त्वात आज उशीरापर्यंत नोंदविण्यात आले. आयएएस अकादमीच्या वसतीगृहात राहणाºया इतर दोन मुली, रॅगिंग घेणाºया पाच मुली आणि वसतीगृहात उपस्थित इतर काही त्रयस्थ मुलींचेही बयाण नोंदविले गेले. आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिलेल्या आदेशानुसार महिला सेल आणि गाडगेनगर पोलीसांचे कर्मचारी सामान्य पोषाखात अंजली देशमुख यांच्यासोबत उपस्थित होत्या. तक्रारकर्त्या आणि इतर मुलींचे स्वतंत्र बयाण जवळपास सारखे आहे. रॅगिंग घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घटनाक्रमही सारखा आहे.