शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

पॅटर्न कोणताही राबवा, पीकविम्यात कंपनीचेच चांगभलं, शेतकरी रिताच !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 1:04 PM

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानेना : कंपनीने नाकारल्या ६७ टक्के पूर्वसूचना

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पीकविम्यासाठी एक रुपयात सहभाग घेता येत असल्याने योजनेत सहभाग वाढला तसा अधिकचा शासन हिस्सा कंपनीकडे जमा झाला. यामध्ये पिकांचे नुकसान झाल्यावरही बहुतांश शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही. शिवाय १.१३ लाख म्हणजेच ६७ टक्के शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना कंपनीने नाकारल्या आहेत. जिल्ह्यात बीड पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्यामुळे पीकविम्यासाठी कोणताही पॅटर्न राबविला तरी यामध्ये कंपंनीचेच उखळ पांढरे होत आहे. 

गतवर्षीच्या खरिपामध्ये ५.१० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये शेतकरी हिस्सा, राज्य व केंद्र शासन हिस्सा असे एकूण ३८२.३५ कोटी रुपये कंपनीकडे जमा करण्यात आले आहेत. गतवर्षी कमी पाऊस व पावसाचा खंड यामुळे पिके खराब झाली असतानाही कंपनीद्वारा केवळ ५० कोटींपर्यंतच परतावा शेतकऱ्यांना दिला आहे. बाधित ४१ महसूल मंडळातील बाधित सोयाबीनकरिता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अधिसूचना काढली तर त्याला कंपनीने त्याला दाद दिली नाही. 

'त्या' शेतकऱ्यांना भरपाई केव्हा?          चिंचपूर येथील बाधित ५२ शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्व्हे करताना सर्व्हेअरने पीक नुकसानीचे पंचनाम्यावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीऐवजी स्वतःच स्वाक्षरी मारली व यामध्ये ० ते ५ टक्केच नुकसान दाखविल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे १५ दिवसांत परतावा देण्याचे आदेश त्यांनी कंपनीला दिले आहेत; परंतु काही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा देण्यात आलेला नाही.

ट्रिगर बदलला, भरपाई नाकारलीचांदूर बाजार तालुक्यात थंडीच्या लाटेदरम्यान हवामान केंद्राभोवती शेकोटी पेटविल्याने व केंद्राच्या कम्पाउंडला २०० वॉटचा बल्ब लावल्याने तापमान आकडेवारीत फरक पडला व विम्याचा ट्रिगर लागला नाही. त्यामुळे लगतच्या केंद्राची आकडेवारी ग्राह्य धरून शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले; मात्र कंपनीचे सहकार्य नसल्याचा कृषी विभागाचा आरोप आहे.

जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी पीकविमा कंपनीला विविध निर्देश दिले आहेत. ते सर्व कंपनीला पाठविण्यात आलेले आहेत. कंपनीकडून पुरेसे सहकार्य मिळत नाही. - राहुल सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाfarmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती